शरीराचा फिटनेस टिकवून ठेवायचा असेल तर व्यायाम केलाच पाहिजे, हे सगळ्यांनाच पटतं. पण त्यासाठी वेळ काढणं अनेकांना कठीण होतं. एकवेळ पुरुष तरी सकाळी व्यायामासाठी वेळ काढू शकतात. पण बहुतांश महिलांना सकाळच्या धावपळीत व्यायामाला जाणं होतंच नाही. त्यामुळे मग सकाळची वेळ टळून गेली तर व्यायाम करावा कधी, हा प्रश्न त्यांना पडतो. पण व्यायाम करण्यासाठी फक्त सकाळचीच वेळ योग्य आहे, असे नाही. तुम्ही सायंकाळी किंवा रात्रीही व्यायाम करू शकता. हल्ली बरेच जण ऑफिसनंतर थेट जीम गाठतात. व्यायाम करतात आणि मगच घरी येतात. कारण रात्री व्यायाम केल्यानेही वजन कमी होतंच (weight loss tips) शिवाय आरोग्याला इतरही भरपूर फायदे होतात. (Amazing Benefits Of Evening Workout)
रात्री व्यायाम केल्याने शरीराला होणारे फायदे
१. ज्यांना रात्री लवकर झोप येत नाही, अशा लोकांनी सकाळपेक्षा रात्रीच व्यायाम करण्याला प्राधान्य द्यावे. कारण रात्री किंवा संध्याकाळी व्यायाम केल्यास शांत आणि पटकन झोप येण्यास मदत होते.
नवरीसाठी कस्टमाईज ब्लाऊजची लेटेस्ट फॅशन- बघा मागचा गळा आणि बाह्यांचे सुपर ट्रेण्डी ९ डिझाईन्स
२. सायंकाळच्या वेळेस व्यायाम केल्यास एन्डोर्फिन हार्मोन जास्त प्रमाणात स्त्रवला जातो. mood lifters हार्मोन म्हणून तो ओळखला जातो. त्यामुळे स्ट्रेस, एन्झायटी कमी होण्यास मदत होते.
३. सकाळी व्यायाम करताना डोक्यात दिवसभराच्या कामाचे, वेळेची जुळवाजुळव करण्याचे अनेक मुद्दे डोक्यात असतात. त्यामुळे शांत चित्ताने व्यायाम करणं होत नाही. पण रात्रीच्यावेळी सगळी कामं करून आपण रिलॅक्स झालेलो असतो. त्यामुळे आणखी जोमात व्यायाम करू शकतो.
टरबूजाचा ज्यूस नेहमीचाच, आता हॉटेलपेक्षाही भारी चवीचं वॉटरमेलन मोजिटो करा- लगेच रेसिपी बघा
४. रात्रीचा व्यायाम झाल्यानंतर आपण झाेपतो. त्यामुळे व्यायाम करून स्नायूंना आलेला थकवा कमी होण्यास मदत होते.
५. रात्रीच्या व्यायामानंतर पुरेसा व्यायाम झाल्याने चयापचय क्रिया वाढते. शिवाय रक्तातील साखरेचे प्रमाणही अधिक नियंत्रित होण्यास मदत होते.