Walking Benefits : रोज थोडा वेळ पायी चालणं ही सगळ्यात सोपी आणि प्रभावी एक्सरसाईज आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र, नेहमीच लोक याबाबत कन्फ्यूज असतात की, रोज किती वेळ चाललं तर फायदे मिळतील. कधी १० हजार पावलांची चर्चा होते तर कधी १२ हजार पावलांची चर्चा होते. कधी अर्धा तास चालण्याची चर्चा तर कधी १ तास चालण्याची. या चर्चांमुळे लोकांचं कन्फ्यूजन होणं सहाजिक आहे. अशात एका अमेरिकन एक्सपर्टनं चालण्याबाबत महत्वाचा खुलासा केला आहे.
अमेरिकेतील एका प्रसिद्ध डॉक्टरांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत चालण्याचे फायदे आणि किती वेळ चालावं याबाबत माहिती दिली आहे. एका रिसर्चचा उल्लेख करत डॉक्टरांनी सांगितलं की, रोज केवळ १० मिनिटं पायी चालूनही तुम्ही तुमचं आयुष्य वाढवू शकता.
ClevelandClinic चे सीनिअर मेडिकल अॅडव्हायजर मार्क हाइमन यांनी एका रिसर्चचे निष्कर्ष शेअर करत सांगितलं की, पायी चालल्यानं तुमचं आयुष्य कसं बदलू शकतं.
कमी होतो मृत्यूचा धोका
डॉक्टरांनी रिसर्चमधील काही महत्वाचे मुद्दे शेअर करत त्यांनी लिहिलं की, द लॅंसेटमध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये सात वर्षापर्यंत ४७ हजार लोकांचं निरीक्षण करण्यात आलं. यातून आढळून आलं की, पायी चालल्यानं मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो.
किती चालणं फायदेशीर
डॉक्टरांनुसार, ६० आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्यांनी रोज ६ ते ८ हजार पावलं चालणं फायदेशीर ठरेल. तर ६० पेक्षा कमी वय असलेल्यांनी रोज ८ ते १० हजार पावलं चाललं पाहिजे. रोज पायी चालल्यास वेगवेगळ्या आजारांचा धोका कमी होतो आणि शरीर फिट राहतं.
झोप चांगली लागेल
पायी चालण्यानं संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. स्नायू मजबूत होतात आणि ब्लड सर्कुलेशनही चांगलं होतं. त्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. तसेच पायी चालण्याच्या सवयीनं तुमच्या झोपेची क्वालिटी सुद्धा सुधारते. त्यामुळे रोज किमान १० मिनिटं तरी पायी चाललं पाहिजे.