सकाळी झोपेतून उठल्यानंतर अनेकदा आपल्याला चक्कर किंवा थकल्यासारखे वाटते. (Iron-rich drinks for women) झोप पूर्ण होऊन देखील सतत आळस येत राहातो. असं वाटतं की, आज अंथरुण सोडूच नये किंवा अंथरुणांवर अजून काही वेळ तरी झोपून राहावं. (stress anxiety problem in women) कोणत्याही कामात उत्साह वाटत नाही. शरीरातील ताकद गळून पडते. असं वारंवार आपल्यासोबत का बरं होतं हे बहुतेकांना कळतं नाही.
ॲनिमियाचा त्रास हा महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. (immunity booster drink for women) जरासे काही काम केले तर त्यांना थकवा किंवा चक्कर येते. सतत छोट्या छोट्या गोष्टींवरुन चिडचिड होते. शरीरात लोह किंवा रक्ताची कमतरता झाली की महिलांमध्ये हा त्रास वाढू लागतो. पुरेशा प्रमाणात आहार घेऊन देखील आपल्या शरीरातील लोहाची कमरता होत नाही.
उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक नको ऊसाचा रस रोज पिताय? त्वचेच्या समस्यांसह ४ आजार जीव नको करतील...
शरीरात लोहाची कमतरता झाल्यावर आपल्याला अशक्तपणा येतो, सतत चिडचिड-राग येत राहतो. (Home remedies to treat anemia) थकवा आणि श्वास घेण्यासही त्रास होतो. त्वचा फिकट गुलाबी पडते तसेच केसगळती, केसांवर टक्कल पडणे, मासिक पाळीदरम्यान अतिरक्तस्त्राव यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. नख तुटणे किंवा नखांवर पांढऱ्या रंगाचे डाग तयार होत असतील तर आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ( Iron deficiency cure natural drinks)आपल्या रोजच्या आहारात आपल्याला पुरेसे लोह न मिळणे, रक्त कमी होणे, गर्भधारणा किंवा अतिप्रमाणात व्यायाम केल्यामुळे देखील अशक्तपणा येतो. अशावेळी आपण काय करायला हवे जाणून घेऊया.
रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर पाण्यात चमचाभर काळे आणि पांढरे तीळ, भोपळ्याच्या बिया घालून पाणी चांगले मिक्स करुन घ्या. त्यानंतर हे पाणी प्या. तीळ आणि भोपळ्याच्या बिया चावून खा. जर आपल्याला हा उपाय रात्री करता येत नसेल तर आपण सकाळी देखील करु शकतो. सकाळीच्या वेळी करताना यात लिंबू किंवा आवळाच्या रस घाला. ज्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जा टिकून राहाण्यास मदत होईल. असे नियमितपणे केल्याने शरीरातील लोहाची कमतरता कमी होईल. थकवा, अचानक डोळ्यांसमोर येणारी अंधारी, अशक्तपणा , छातीत दुखणे, डोकेदुखी यांसारख्या समस्या कमी होतील. तसेच मासिक पाळीत होणारी पोटदुखी, अतिरक्तस्त्राव आणि क्रॅम्प्स कमी होतील.