योगा, सुर्यनमस्कार, स्ट्रेचिंग, सायकलिंग, रनिंग, वेटलिफ्टिंग, जीम असे सगळे व्यायाम करून बोअर झाला असाल फिटनेससाठी काहीतरी नवं ट्राय करायचा विचार करत असाल, तर काही दिवस हा ॲनिमल फ्लो (animal flow) नावाचा व्यायाम करून बघा.... व्यायाम खऱ्या अर्थाने एन्जॉय करायचा असेल आणि व्यायामाचा आनंद घ्यायचा असेल तर ॲनिमल फ्लो वर्कआऊट त्यासाठी बेस्ट आहे, असं बऱ्याच सेलिब्रिटींचं मत आहे. कतरिना कैफ, करिश्मा तन्ना, प्रिटी झिंटा यांच्यासोबतच बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींना Animal flow हे वर्कआऊट आवडतं. असंच हे वर्कआऊट आवडत आहे आपल्या मराठमोळ्या लाडक्या स्वप्निल जोशीला.
Animal flow वर्कआऊट करतानाचा एक व्हिडियो स्वप्निलने नुकताच इन्स्टाग्रामला (instagram) शेअर केला आहे. या व्हिडियोला त्याने Animal flow !!! Learning from my Guru !!! असं कॅप्शन दिलं आहे. आपण हे वर्कआऊट शिकतो आहाेत, असं स्वप्निलने यात म्हटलंय खरं, पण स्वप्निलचं वर्कआऊट पाहून असं मुळीच वाटत नाही. तो खूपच सफाईदारपणे त्याच्या ट्रेनरसोबत व्यायाम करत आहे, हे व्हिडियो पाहून लगेच लक्षात येतं.
काही दिवसांपुर्वी स्वप्निलने ॲनिमल वॉक (animal walk workout by actor Swapnil Joshi) या प्रकारातलं वर्कआऊट केलं होतं. त्याचं हे वर्कआऊट देखील त्याच्या चाहत्यांना खूपच आवडलं होतं आणि ते ही सोशल मिडियावर चांगलच हीट झालं होतं. या व्हिडियोमध्ये त्याने ॲनिमल वॉक वर्कआऊटचे फायदेही त्याच्या चाहत्यांना समजावून सांगितले होते. दोन्ही हात जमिनिवर टेकवायचे. दोन्ही हातांचे तळवे आणि दोन्ही पाय यांच्यावर शरीराचे संतूलन राखण्याचा प्रयत्न करायचा. यानंतर चार पायांवर एखादा प्राणी जसा चालतो, तशा पद्धतीने चालायचे. म्हणजेच उजवा पाय आणि उजवा हात एकसाथ पुढे घ्यायचा आणि त्यानंतर डावा पाय आणि डावा हात एकसाथ पुढे घ्यायचा. अशा चालण्याच्या पद्धतीला ॲनिमल वॉक म्हणतात.
Animal flow workout म्हणजे काय ?What is Animal flow workout?हा एक व्यायामाचा नवा प्रकार असून कोणत्याही ट्रॅडिशनल व्यायामापेक्षा तो अधिक प्रभावी ठरतो आहे. नावातच या व्यायामाचा अर्थ असून यामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांच्या पोझिशन्स घ्यायच्या असतात. हा व्यायाम आपल्याला जमिनीवरच करायचा असतो आणि यासाठी कोणत्याही विशेष साधनांची गरज नसते. त्यामुळेच लॉकडाऊनकाळात जीम बंद असल्याने अनेक सेलिब्रिटींना याच वर्कआऊटचा मोठा फायदा झाला. एन्जॉयमेंट ॲण्ड फन ही या व्यायामाची सगळ्यात महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. फिटनेस आणि स्टॅमिना जबरदस्त मिळत असल्याने हा वर्कआऊट प्रकार दिवसेंदिवस अधिकच लोकप्रिय होत चालला आहे.
अशी घ्या काळजी- हा व्यायाम ट्रेनर, फिटनेस एक्सपर्ट यांच्याकडून आधी व्यवस्थित शिकून घ्या आणि त्यानंतरच करा.- जेव्हा नव्याने तुम्ही ॲनिमल वॉक किंवा ॲनिमल फ्लो वर्कआऊट करणार असाल, तेव्हा काही काळ ५ मिनिटांसाठीच हा व्यायाम करा. त्यानंतर वेळ वाढवत न्या आणि जसे झेपेल तसे १० ते १५ मिनिटांसाठी ॲनिमल वॉक, ॲनिमल फ्लो करा.
Animal flow workout चे फायदेBenefits of animal flow workout१. या व्यायाम प्रकारातून शारीरिक आणि मानसिक व्यायाम होतो.२. फिटनेस मिळविणे आणि स्टॅमिना वाढविणे हे या व्यायाम प्रकाराचे मुख्य फायदे आहेत.३. शरीराची लवचिकता आणि गतिशीलता वाढवायची असेल, तर Animal flow workout जरूर करावे.४. Animal flow workout नियमितपणे केल्यामुळे स्नायू आणि सांधे मजबूत होतात.५.Animal flow workout मुळे श्वासांवर नियंत्रण ठेवता येते.