स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जे सेलिब्रिटी खूप जास्त मेहनत घेत असतात, अशा सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेत्री करिष्मा तन्ना. तिचा फिटनेस आणि फिटनेसचे वेगवेगळे व्हिडियो तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी असतात. कार्डिओ वर्कआऊट, वेट ट्रेनिंग, डाएट हे सगळे तिच्या फिटनेसचे फंडे असून एनिमल फ्लो वर्कआऊटही करिष्मा नियमितपणे करत असते. हा एनिमल फ्लो वर्कआऊट नावाचा प्रकार नेमका आहे तरी काय ? आणि तो करिष्माला जर एवढे फिट ठेवू शकत असेल तर आपल्यालाही उपयोगी ठरेल का ?, असे प्रश्न आता फिटनेस प्रेमींच्या डोक्यात फिरत आहेत.
करिष्मा तन्नाने काही व्हिडियो नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती जीममध्ये तिच्या फिटनेस ट्रेनरसोबत Animal flow workout करताना दिसत आहे. यामधील सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या व्हिडियोमध्ये करिष्मा वर्कआऊट करून घामेजलेली दिसत असली तरी ती तिचे वर्कआऊट मनापासून एन्जॉय करते आहे, हे लगेचच लक्षात येते. या व्हिडियोमध्ये करिष्माचा चेहरा अतिशय आनंदी दिसत आहे. करिष्माप्रमाणे प्रत्येकानेच जर वर्कआऊट एन्जॉय केलं तर नक्कीच त्याचा फिटनेसवर अधिक चांगला परिणाम दिसून येऊ शकतो.
Animal flow workout म्हणजे काय ?हा एक व्यायामाचा नवा प्रकार असून कोणत्याही ट्रॅडिशनल व्यायामापेक्षा तो अधिक प्रभावी ठरतो आहे. नावातच या व्यायामाचा अर्थ असून यामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांच्या पोझिशन्स घ्यायच्या असतात. हा व्यायाम आपल्याला जमिनीवरच करायचा असतो आणि यासाठी कोणत्याही विशेष साधनांची गरज नसते. त्यामुळेच लॉकडाऊनकाळात जीम बंद असल्याने अनेक सेलिब्रिटींना याच वर्कआऊटचा मोठा फायदा झाला. एन्जॉयमेंट ॲण्ड फन ही या व्यायामाची सगळ्यात महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. फिटनेस आणि स्टॅमिना जबरदस्त मिळत असल्याने हा वर्कआऊट प्रकार दिवसेंदिवस अधिकच लोकप्रिय होत चालला आहे. योगासने आणि ऐनिमल फ्लो वर्कआऊट बऱ्याचअंशी सारखेच वाटतात.
Animal flow workout चे फायदे१. या व्यायाम प्रकारातून शारीरिक आणि मानसिक व्यायाम होतो.२. फिटनेस मिळविणे आणि स्टॅमिना वाढविणे हे या व्यायाम प्रकाराचे मुख्य फायदे आहेत. ३. शरीराची लवचिकता आणि गतिशीलता वाढवायची असेल, तर Animal flow workout जरूर करावे.४. Animal flow workout नियमितपणे केल्यामुळे स्नायू आणि सांधे मजबूत होतात. ५.Animal flow workout मुळे श्वासांवर नियंत्रण ठेवता येते.