Join us

काय सांगता? चक्क प्राण्यांसारखे चालून व्हा फिट, अंशुका परवानी सांगते फिटनेसचा अनोखा फंडा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2024 11:58 IST

Animal Walk Yoga : What Are Animal Flow Workouts : Anshuka Parwani Shares Animal Walk Yoga : प्राणी चालतात तस चालत व्यायाम केला तर व्यायाम मजेशीरही होतो आणि फिटनेसही वाढतो.

'दिल तो पागल है' या सुप्रसिद्ध चित्रपटांतील 'घोडे जैसी चाल... हाथी जैसी दुम...' हे गाणं आपल्याला सगळ्यांना माहीतच असेल. पण खरंच कल्पना करा की आपण मानवाने आपली चाल सोडून प्राण्यांसारखे चालण्यास सुरुवात केली तर?... तर काय होईल? आपल्यापैकी काही जण फिट राहण्यासाठी (Anshuka Parwani Shares Animal Walk Yoga) जिम, योगा, झुंबा किंवा अजून काही वेगेवगेळ्या (What Are Animal Flow Workouts) अ‍ॅक्टिव्हिटी करतात. जर आपल्याला कोणी सांगितले की प्राणी जसे चालतात तसे आपण चालल्याने फिट अँड फाईन राहू शकतो. तर यावर तुमचा विश्वास नाही बसणार. पण हे खरं आहे की, प्राण्यांची चाल फॉलो केल्याने आपण आपले आरोग्य सुधारु शकतो(Animal Walk Yoga).

दररोजचा व्यायाम किंवा योगा करत असताना त्याच्यासोबतच आपल्याला हा व्यायाम करायचा आहे. खेकडा, बदक, माकड, मुंगी, अस्वल यांच्याप्रमाणे चालून आपण आपले आरोग्य सुदृढ ठेवू शकतो. प्राण्यांची चाल फॉलो करून आपण कसे फिट राहू शकतो ते समजून घेऊयात. सुप्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani) हिने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन प्राण्यांची चाल फॉलो करून आपण कसे फिट राहू शकतो याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत, अंशुका स्वतः वेगवेगळ्या प्राण्यांप्रमाणे चालून कसे फिट राहता येईल याबद्दल अधिक माहिती देत आहे.

प्राण्यांप्रमाणे चालायचं म्हणजे नक्की काय करायचं ?

१. फ्रॉग जम्प (Frog Jump) :- लहानपणी शाळेत असताना आपण सगळ्यांनीच 'बेडूक उड्या' मारल्याचे आपल्याला बऱ्यापैकी आठवत असेल. त्याचप्रमाणे आपल्याला फिट राहण्यासाठी आता देखील बेडूक उड्या माराव्या लागणार आहेत. यासाठी सर्वात आधी आपल्या दोन्ही पायांत थोडे अंतर ठेवून गुडघ्यात वाकून तळपायांवर जोर देत खाली बसा. आता पायांप्रमाणेच हातांचे पंजे देखील जमिनीला टेकवत स्पर्श करा. मग हातांच्या पंज्यावर जोर देत दोन्ही पाय उचलून पुढे उडी मारा. अशाप्रकारे बेडूक जसा उद्या मारतो तशा उड्या माराव्यात. 

हिवाळ्यात थंडीमुळे हुडहुडी भरते? सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगते थंडी पळवण्यासाठी खास ३ योगासनं...

२. क्रॅब वॉक (Crab Walk) :- क्रॅब वॉक म्हणजे खेकड्याची चाल आपण करू शकतो. दोन्ही हात आणि दोन्ही पाय याच्यावर उताणे होऊन हात व पाय यांच्या मदतीने दोन पावले पुढे आणि दोन पावले मागे चाला. तुमच्या शरीराचे पूर्ण वजन तुमच्या दोन्ही हातांवर आणि पायांवर असले पाहिजे. यामुळे तुमचे हात आणि पायांचे मसल्स टोन्ड होण्यास मदत होईल.     

३.  डक वॉक (Duck Walk) :- डक वॉक म्हणजे बदकाची चाल करून आपण फिट राहू शकतो. दोन्ही पायांच्या तळव्यांवर जोर देऊन उभे राहून गुढघ्यात वाकून खाली बसा. दोन्ही हात जोडून नमस्कार करा. गुडघ्यात वाकून बदकासारखे चाला. खाली वाकल्यावर दोन्ही हात असे जोडा की तुमचे दोन्ही पायांचे गुडघे त्यामध्ये बरोबर अडकतील. 

हिवाळ्यात तूप खाल्लं म्हणून खरंच वजन वाढत का ? बघा एक्स्पर्ट सांगतात यामागचं खरं कारण...

४. माकड उड्या (Travelling Ape) :- Travelling Ape म्हणजेच वानर उड्या वानर जसे एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर सतत उड्या मारत असतात त्याचप्रमाणे आपण देखील माकड उड्या मारायच्या आहेत. गोरिला वॉक करताना आपल्याला चक्क लहान मुलांसारख्या माकड उड्या मारण्याचा आनंद घ्यायचा आहे. गोरिला वॉक करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या दोन्ही हातांचे पंजे आपल्या दोन्ही पायांच्या तळव्यासमोर येतील असे कमरेतून वाका. यांनतर हातांच्या पंज्यावर जोर देऊन पंजे जागचे न हलवता पायांच्या मदतीने उड्या मारा. उड्या मारल्याने तुमच्या सर्वांगाचा व्यायाम होईल. 

५. अस्वलाची चाल (Bear Crawl) :- लहान बाळ जसे दोन्ही हात आणि पायांवर रांगते तसेच आपल्याला जमिनीवर रांगत पुढे चालायचे आहे. अस्वल चालताना जसे दोन्ही हात आणि दोन्ही पायांचा वापर करते त्याचप्रमाणे आपल्यालासुद्धा तसेच चालायचे आहे. अस्वलासारखे चालताना दोन्ही हात आणि दोन्ही पायांचे गुडघे यांच्या मदतीने जमिनीवर चाला.

टॅग्स :फिटनेस टिप्सयोगासने प्रकार व फायदे