सुप्रसिद्ध अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. अंकिता नेहमीच आपल्या चाहत्यांसह वेगवेगळ्या फिटनेस टिप्स शेअर करत असते. नुकताच अंकितानं धावण्याचा एक फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये तिनं धावणं तिच्यासाठी किती महत्वाचं आहे हे सांगितलं आहे.
'धावणं हे श्रेष्ठ आहे. यामुळ माझ्या जीवनाला दृष्टीकोन मिळतो. मला स्वतःला वाचवण्याची आवश्यकता वाटत नाही, कारण जेव्हा मी रस्त्यावर असते तेव्हा मी स्वतः चीच असते. रस्त्यांचा काही अंदाज नसतो. सर्व काही काढून टाकले जाते आणि उर्वरित जग शांत होते. मी आणि माझ्या सभोवतालचा परिसर यांतील सीमा पुसट होतात आणि मी माझ्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींसह एकरूप होते. त्या क्षणांमध्ये मला शांती मिळते आणि मी स्वतःला शोधते.' #runninggirl #runnersofindia #tuesdaythoughts #guwahati #axomiya या हॅशटॅगसह अंकितानं आपल्या चाहत्यांसोबत पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
५५ वर्षीय मिलिंद सोमणनं सांगितल्या रनिंग टिप्स
मिलिंदने खुलासा केला की तो नेहमी आरामदायक चपला वापरतो. "चालण्यासाठी चपला किंवा लुना सँडल घालतो. मला बंद शूज अस्वस्थ वाटतात, मी माझ्या नैसर्गिकरित्या चालण्याचा प्रयत्न करतो. मला मऊ / कडक पृष्ठभागाचा काहीही फरक पडत नाही. टेक्निकचा विषय आहे. हळूवारपणे, योग्यरित्या नियमितपणे धावणे पाय मजबूत करणं आणि गुडघ्यांसाठी चांगले आहे. "
जेव्हा आपण दररोज व्यवस्थित धावता तेव्हा पाय, गुडघे मजबूत होतात. एकदा आपण धावणे सुरू केले आणि आजारी पडल्यानंतर पुन्हा रिकव्हर झाल्यानंतर पुन्हा हळूहळू धावायला सुरूवात करा. जर तुम्ही नियमित धावाल तरच तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.
''जर मी पाच ते सहा कि.मी. धावत आहे तर मला एका दिवसात विशेष आहाराची आवश्यकता नाही. होय, रोज जर मी ५० ते ६० कि.मी. चालत असल्यास मला माझ्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मला अधिक खाण्याची आवश्यता असू शकेल.'' असंही तो म्हणाला.
पुढे त्यानं सांगितलं होतं की, ''मी धावताना कधीही सनस्क्रीन वापरत नाही. धावताना जर ऊन जास्त असेल तर मी फक्त माझ्या तोंडावर दही लावतो. जेव्हा दही सुकल्यानंतर मी माझे तोंड पाण्याने धुतो. यामुळे त्वचा गुळगुळीत होते आणि टॅनिंगचा त्रास होत नाही.''
वयाच्या 55 व्या वर्षी मिलिंद आपले आरोग्य आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करतो. तो तरूणांसाठी प्रेरणादायक ठरत असून तो बर्याचदा लोकांना कोरोनाची लस घेण्याचे असे आवाहन करत आहे. कारण, तो कोरोनापासून बरा झाल्यानंतर, त्यातील लक्षणे, शारीरिक दुर्बलता जाणवली आहे, अशा परिस्थितीत ते कोरोनाला एक कठीण अनुभव म्हणून तो त्याच्याकडे पाहतो.