हिवाळा म्हटलं की सगळ्यांनाच आठवते ती हुडहुडी भरवणारी थंडी. थंडीच्या दिवसांत वातावरणातील गारठ्याने आपल्याला थंडी लागतेच. दिवसेंदिवस जशी थंडी वाढत जाते तशी अधिकच थंडी (Best Mudra and Pranayama for Winters to keep body warm) जाणवू लागते. हिवाळ्यात थंडी लागणे ही अगदी कॉमन गोष्ट आहेच. परंतु आपल्यापैकी बरेचजण असे असतात ज्यांना नेहमीच थंडीत इतरांपेक्षा थोडी जास्त थंडी लागते. हिवाळ्यात थंडी (Yoga Mudras For Winter) पासून बचाव करण्यासाठी आपण उबदार कपडे, किंवा शरीरात उष्णता निर्माण करणारे काही पदार्थ तर नक्कीच खातो. परंतु काही मोजक्या योगासनांचे प्रकार आणि मुद्रा करुन देखील आपण आपली थंडी घालवू शकतो( Anshuka Parwani Shares Easy Yoga Mudras For Winter Season).
होय... योगासनं किंवा हातांच्या मुद्रा केल्याने आपल्या शरीरातील उष्णता वाढवण्यास नैसर्गिकरित्या मदत केली जाते, परिणामी आपल्याला फारशी थंडी लागत नाही. सुप्रसिद्ध फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी नेहमीच रोजच्या लाईफस्टाईलमध्ये उपयोगी पडतील अशी योगासनं, एक्सरसाइज किंवा डाएट आणि आरोग्याशी संबंधित टिप्स देत असते. नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हिवाळ्यात जास्त थंडी लागू नये यासाठी थंडीपासून बचाव करताना कोणती योगासनं व मुद्रा करावीत याबद्दल अधिक माहिती दिली आहे.
हिवाळ्यात जास्त थंडी लागू नये यासाठी करा ही योगासनं आणि मुद्रा...
१. सूर्यमुद्रा :- सगळ्यात आधी मांडी घालून खाली बसावे. सूर्यमुद्रा करण्यासाठी आपल्या हातांचे तळवे सर्वात आधी आपल्या समोर पुढ्यात घ्यावेत. त्यानंतर आपल्या हाताची अनामिका म्हणजेच करंगळीच्या बाजूनचे बोटं अर्धवट दुमडून आपल्या हातांच्या तळव्याला स्पर्श करेल असे ठेवावे. त्यावर आपला हातांचा अंगठा ठेवून हलकेच दाब द्यावा. मांडी घालून बसल्याने आपल्या हातांची अशी सूर्यमुद्रा करुन हात आपल्या दोन्ही ढोपरांवर ठेवावेत. मग डोळे बंद करून हलकेच श्वासोच्छ्वास करत राहावे. डोळे बंद करावेत. अशा स्थितीत ५ ते १५ मिनिटे बसावे.
उद्यापासून पहाटे लवकर उठायचंय? ६ टिप्स- गजर होण्यापूर्वी जाग येईल-तडक लागाल कामाला...
२. सूर्य भेदन प्राणायाम :- सूर्य भेदन प्राणायाम करण्यासाठी सगळ्यात आधी व्यवस्थित मांडी घालून खाली बसावे. त्यानंतर हातांची ध्यानमुद्रा करावी. डोळे बंद करावेत. डावी नाकपुडी हातांच्या बोटाने हलकेच दाब देत बंद करावी. त्यानंतर उजव्या नाकपुडीने हलकेच श्वास घ्यावा. मग उजवी नाकपुडी बंद करुन डाव्या नाकपुडीने हलकेच श्वास सोडावा. सूर्य भेदन प्राणायाम म्हणजे उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन मग थोड्यावेळासाठी रोखून मग डाव्या नाकपुडीने सोडणे. २ ते ५ मिनिटे आलटून - पालटून एकदा उजवी आणि एकदा डावी नाकपुडी अशा पद्धतीने हे योगासनं करावे.
करीना कपूर उत्तम फिटनेससाठी रोज घालते सूर्यनमस्कार, पाहा ‘तिची’ सुपरहिट योगा पद्धत आणि स्टॅमिना...
३. भस्त्रिका योगासनं :- सर्वप्रथम जमिनीवर मांडी घालून व्यवस्थित बसावे. कंबर, मान आणि पाठीचा कणा सरळ ठेवून शरीर आणि मन स्थिर ठेवा. डोळे बंद करा. त्यानंतर आपले दोन्ही हात वर करत जलद गतीने श्वास घ्या आणि वेगाने श्वास सोडा. श्वास घेताना पोट फुगवा आणि श्वास सोडताना पोटाला आत घ्या. श्वास घेताना सोडताना त्याबरोबर आपले दोन्ही हात वर खाली करत राहावे. हे योगासनं केल्याने नाभीस्थळावर दाब येतो.
मासिक पाळीत रक्ताच्या गाठी जास्त? टेंशन घेऊ नका, डॉक्टर सांगतात मासिक पाळीत असं होतं कारण...
अशा प्रकारे योगासनं आणि मुद्रा केल्याने आपल्या शरीरात हिवाळ्यात उष्णता निर्माण होऊन आपल्याला थंडी लागत नाही.