डॉ. यशपाल गोगटे
आधुनिक तंत्रज्ञानात यंत्राचा आकार जितका छोटा तितकी त्यातली टेकनॉलॉजी भारी! तसेच काहीसेमानवी शरीरातही घडत असते. आपल्या आजूबाजूस काही अतिशय बारीक व्यक्ती असतात परंतु त्या अधिक काटकअसतात. त्यांना बरेच वेळा बारक्या, लुकड्या म्हणून हिणवले जाते. आई वडिलांच्या मनात तर अश्या मुलांनाजबरदस्तीने खायला घालून त्यांचे वजन वाढवण्याचा एकमेव विचार असतो. अश्या तर्हेचा कमी वजनाचा न्यूनगंड नबाळगता या मुलांना कायम कसे बारीक ठेवता येईल या कडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. अशा मुला-मुलींनी बारिकच काराहावे या बद्दलची माहिती जाणून घेऊ.
बाळसे की सूज?
गरोदरपणात कुपोषित मातांची अर्भके कमी वजनाची असली तरीही काटक असतात. गरोदरपणातकुपोषणामुळे बाळाच्या शरीराला कमी कॅलोरीज मध्ये शरीराचे व्यवस्थापन उत्कृष्ट सांभाळता येते. जन्मानंतर मात्रया कमी वजनाच्या बाळांना बाळसेदार - गुबगुबीत करण्याच्या हव्यासापायी त्यांना अधिक प्रमाणात (आवश्यकतानसतांना मागे लागून ) खायला दिले जाते. कमी कॅलोरीजवर निभावणाऱ्या त्यांच्या शरीरावर या अतिरिक्तखाण्याचा भार येतो. ही मुले बाळसेदार तर होतात परंतु हे बाळसे त्यांच्या पुढील वयात लठ्ठपणामुळे होणाऱ्याआजारांना निमंत्रण देते. खास करून वयात येण्याच्या काळात या मुला-मुलींचे वजन झपाट्याने वाढते. म्हणूनचजन्मतः कमी वजनाच्या (२.५ किलोच्या आतील ) बाळांचे वजन वाढवण्याचा अट्टाहास टाळावा. या उलट त्यांनाआपण योग्य वजनात हेल्दी राहण्यावर भर द्यावा. शक्यतो या मुलांना बारक्या, किडकिडीत असे म्हणून हिणवू नये.प्रतिकूल परिस्थितीत, कुपोषित आईच्या पोटात वाढलेल्या अर्भकाच्या शरीराचे कार्य कमी कॅलोरीज मध्येदेखील उत्तम चालते. त्याला अनुकूल परिस्थिती मिळाल्यास तो लठ्ठपणा कडे वळतो व चयापयाच्या आजारांना बळीपडतो.
Thin- Fat इंडियन
१८-२० वयानंतर आपली उंची स्थिरावते व हाडांची वाढ थांबते. त्यामुळे या वयात जे वजन असते तेआपल्या शरिराला सहजपणे पेलवते. सामान्यतः एक समज आहे की वयाबरोबर वाढणारे वजन हे शरीरालासहजपणे पेलवता येते. तुमच्या १८-२० वर्षाच्या वजनापेक्षा जर तुमचे वजन ५ किलो पेक्षा अधिक असेल, आणिजरीही ते उंचीला प्रमाणशीर असेल तरीही ही लठ्ठपणाची सुरवात ठरू शकते. ही गोष्ट खास करून भारतीय समाजातखरी ठरते.बऱ्याचशा भारतीयांचे वजन जन्मतः कमीच असते व ते १८-२० व्या वर्षापर्यंत कमीच राहते. आपल्या ‘वजन प्रेमी’ मानसिकतेमुळे या लोकांना जाड केले जाते. यामुळे आज भारतामध्ये चयापचयाचे आजार साथीच्यारोगाप्रमाणे पसरत आहेत. भारतीयांमध्ये आढळणाऱ्या अशा लोकांना थिन फॅट असे म्हटले जाते. ही लोकं दिसायलाजरी बारीक असली तरीही त्यांच्या शरीरातील चरबीचे प्रमाण अधिक असते व ते नुकसानकारक ठरते. त्यामुळेतुलनात्मक रीतीने ते लठ्ठ केव्हा जाड याच वर्गात मोडतात. अश्या लोकांनी फक्त दिसण्याचा विचार न करता थिन फॅट न राहता थिन फिट राहण्याचा प्रयत्न करावा.
(लेखक एंडोक्रिनॉलॉजिस्ट, हार्मान तज्ज्ञ आहेत.)