करीना कपूर, काजोल, ऐश्वर्या रॉय बच्चनपासून ते आलिया भट, सोनम कपूर, भूमी पेडणेकर अशा अनेक बॉलिवूड अभिनेत्रींचा फॅट टू फिटचा प्रवास आपण सगळ्यांनीच पाहिला आहे. यामध्ये आता आणखी एका नावाची भर पडली आहे ती म्हणजे अभिनेता अर्जून कपूरची (Arjun Kapoor) बहीण अंशुला कपूर (Anshula kapoor) हिची. अंशुलाने नुकतेच सोशल मीडियावर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अंशुलाची फॅट टू फिट (Fat to fit) फिगर. अंशुला कपूर वेगवेगळ्या कारणांमुळे बरेचदा चर्चेत असते. यावेळीही तिच्या कमी झालेल्या वजनामुळे तिचे कौतुक होत आहे.
अर्जुनच्या बहिणीचे हे बदलेल रुप पाहून अनेकांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. अर्जुन कपूर फिटनेसबाबत नेहमी सजग असल्याचे आपण पाहतो. त्याचे फिटनेसचे काही फोटो आणि व्हिड़िओही सोशलस मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे भावाकडून प्रेरणा घेऊन अंशुलानेही आपले वाढलेले वजन कमी करायचे ठरवले आणि तिने ते करुनही दाखवले. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये अंशुला एकदमच वेगळी आणि ग्लॅमरस दिसत आहे. मोकळे सोडलेले कुरळे केस आणि सैल टी-शर्ट आणि ट्रॅकपँट घातलेली अंशुला एकदम फिट असल्याचे दिसत आहे.
आपल्या या फोटोला कॅप्शन देताना अंशुला हिने म्हटले आहे. मेकअप काढा, केस मोकळे सोडा आणि आरशात पाहा. तुम्ही स्वत:लाच आवडायला लागाल. तिच्या या फोटोंची तुलना आधीच्या फोटोशी केल्यास, अंशुलाने तिच्या फिटनेससाठी किती मेहनत घेतली आहे, याचा अंदाज आपण सहज लावू शकतो. अंशुला भाऊ अर्जून कपूरसोबत अनेकदा दिसते, पण तिच्या हेवी वेटबाबत अनेकदा चर्चा व्हायची. पण आता अंशुलाच्या या फिट झालेल्या अवतारातील फोटोवर अनेकांनी कमेंटस करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
तिच्या फोटोवर काका संजय कपूरसह कतरिना कैफसारख्या अनेक कलाकारांनी कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. कैतरीना तिच्या कमेंटमध्ये म्हणते, लूक अॅट यू..आणि डोळ्यात बदाम असणारे स्मायली पाठवले आहेत. अंशुला कपूरचा हा नवा अवतार पाहून चाहते मलायका अरोरालाही याच श्रेय देत आहेत. चाहत्यांनी म्हटले आहे की, मलायका लाइफमध्ये आल्यानंतर नणंदेनेही फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. अंशुला भावाची आणि वडिलांची लाडकी असल्याचे आपल्याला माहित आहे. त्यामुळे अंशुलाचे हे परिवर्तन पाहून तिच्या कुटुंबीयांना आनंद झाला नसेल तरच नवल.