Join us  

मनगट बारीक पण दंड जाडजूड झाले? २ व्यायाम-स्लिम होतील दंड, स्लिव्हलेस ड्रेसमध्ये सुंदर दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 4:39 PM

Arm Fat Loss Tips : प्रत्येकाचे शरीर वेगवेगळे असले तरी फॅट्स विशिष्ट ठिकाणीच जमा होतात ज्यामुळे पूर्ण शरीरच बेढब दिसते.

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी चांगला आहार घेणं गरजेचं असतं. चांगली लाईफस्टाईल असेल तरीही लोकांना योगा आणि व्यायाम करण्यसाठी वेळ नसतो. सतत बसून काम केल्यामुळे आणि खाण्यात कार्ब, तेलकट पदार्थ आल्यामुळे शरीरातील एक्ट्रा फॅट्स वाढत जातात. खासकरून मांड्या, पाठ, कंबर आणि दंडांवर जास्तीची चरबी दिसून येते.  कितीही व्यायाम केला तरी ही चरबी सहज कमी होत नाही. (Arm Fat Loss Tips)

प्रत्येकाचे शरीर वेगवेगळे असले तरी फॅट्स विशिष्ट ठिकाणीच जमा होतात ज्यामुळे पूर्ण शरीरच बेढब दिसते. हातांची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही कमीत कमी वेळात २ सोपी योगासनं घरीच करू शकता. ज्यामुळे पोटाची चरबी कमी होईल आणि तुम्ही मेंटेन दिसाल. (How to loss arm fat Two Best Ways to Lose Arm Fat)

आर्म फॅट वाढण्याचे कारण

जर तुम्हाला हातांच्या आजूबाजूंना फॅट्स जास्त दिसत असेल  तर याचा अर्थ असा की तुम्ही आहारात कार्ब्स आणि साखर जास्त प्रमाणात खात आहात. आर्म फॅट कमी करण्यासाठी सगळ्यात आधी साखर खाणं पूर्णपणे बंद करा. व्यायाम करा आणि नियमित आरोग्य तपासणी करत राहा.

पोट, कंबरेच्या टायर्समुळे फिगर बेढब झाली? हे १ योगासनं करा-चरबी भराभर होईल कमी

भुजंगासन

आर्म फॅट कमी करण्यासाठी हे आसन परफेक्ट आहहे. भुजंगासन तुमचे खांदे आणि दंड मजबूत करते. यामुळे शरीराची लवचिकता  वाढते इतकंच नाही तर थकवा आणि पाठदुखी दूर करण्यास मदत होते.  भुजंगासन करण्यासाठी सगळ्यात आधी पोटावर झोपा आणि हात  कंबरेच्या वर आणून जमिनीला टेकवा. नंतर हातावर जोर देऊन अप्पर बॉडी वर उजला. खालचे शरीर जमीनीवर ठेवून दीर्घश्वास घ्या आणि पुन्हा श्वास सोडा. ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करा.

ऐन तारुण्यात गुडघे-कंबर दुखते! स्वस्तात मस्त प्रोटीन देणारा १ पदार्थ, रस्त्यावर मिळेल १० रुपयांत वाटा

अधोमूख श्वासासन

अधोमूख श्वासासनाला Downward-Facing Dog Pose असं म्हणतात. हा व्यायाम करताना तुम्हाला डोकं जमिनीच्या दिशेने झुकवावे लागते. ज्यामुळे स्काल्पचं ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. यामुळे पोटऱ्या आणि हॅमस्ट्रिंगवर दबाव येतो. या आसनाने पाठीच्या कण्यालाही आराम मिळतो आणि शरीरातील एक्स्ट्रा फॅट्स कमी होतात. 

टॅग्स :हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सआरोग्य