वजन कमी करणं (Weight Loss) जणू टास्क बनलं आहे. वेट लॉस करताना आपल्याला लवकर रिझल्ट दिसून येत नाही, पण याची प्रोसेस खूप मोठी असते (Fitness). वजन वाढलं की फक्त शरीर बेढब दिसत नसून, गंभीर आजारांचाही धोका वाढतो. त्यामुळे बरेच कलाकार वेट लॉस करतात. युट्युबर (Youtuber) आशिष चंचलानी (Ashish Chanchlani) देखील आपल्याला वेट लॉस जर्नीसाठी सध्या चर्चेत आहेत. त्याचे व्हिडिओ ज्यापद्धतीने व्हायरल होतात, त्याच पद्धतीने त्याचे फिटनेसचे व्हिडिओ व्हायरल होतात.
आशिषचं आधी वजन खूप वाढलं होतं. एका पार्टीमध्ये शाहरूख खानने त्याच्या पोटाला हात लावत पोट कमी करण्याचा सल्ला दिल्याचे त्याने या पोस्टमधून म्हटले आहे. आणि हीच गोष्ट मनावर घेत त्याने मेहनतीने वेट लॉस केलं आहे. आशिषच्या वेट लॉसमागचं रहस्य काय? कोणता वेट लॉस फंडा त्याच्या वेट लॉससाठी उपयुक्त ठरला? पाहूयात(Ashish Chanchlani reveals diet that helped him shed 40 kgs).
आशिष चंचलानीने वेट लॉससाठी नक्की काय केलं?
अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये त्याने आपल्याला वेट लॉस जर्नीबद्दल सांगितलं. त्यानं ४ महिन्यामध्ये १५ किलो वजन केलं. यासाठी त्याने नियमित व्यायाम आणि योग्य डाएट फॉलो केले. वजन कमी करण्यासाठी त्याने कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगसह रोज ४ तास व्यायाम केल्याचे सांगितले आहे. याशिवाय कार्डिओ, सायकलिंग आणि रनिंग या व्यायामावरही भर दिले.
कंबर, मांड्या - थुलथुलीत पोट कमीच होत नाही? कोमट पाण्यात घाला 'या' फळाचा रस; वजन घटेल - दिसाल सुडौल
वेट लॉसबद्दल आशिष म्हणतो, 'मला नेहमीच वजन कमी करायचे होते. माझे वजन १३० किलोपर्यंत पोहचले होते. जेव्हा मी स्वतःला आरशात पाहिलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं. तेव्हा मी प्री- डायबिटीसच्या स्टेजवर होतो. २९ वर्षातचं जर असा गंभीर आजार मला घेरत असेल तर, निश्चितच मला स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला हवे असे वाटलं.'
आशिष पुढे म्हणतो, '८ जून २०२३ रोजी माझे वजन १३० किलो होते. तर ८ डिसेंबर २०२३ रोजी माझे वजन ८८ किलोवर आले. आता माझे वजन ९९ किलो आहे. फॅट्स कमी मसल्स ग्रोथकडे मी जास्त भर देतो.'
कॅलरीज डेफिसेट
आशिष म्हणतो, 'वेट लॉससाठी मी अनेक ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ पहिले. तेव्हा मला जाणवलं व्यायामासह डाएटवरही भर द्यायला हवं. फॅट्स बर्न करण्यासाठी कॅलरीज इनटेक कमी करायला हवे. कॅलरीज डेफिसेट म्हणजे शरीराच्या गरजेपेक्षा २०० - ३०० कॅलरीज कमी खाणे. यामुळे वेट लॉससाठी मदत होते.'