Join us  

Avoid 3 Mistakes While Walking : व्यायाम म्हणून चालायला जाताय? ३ चुका कराल तर होणार नाही चालण्याचा उपयोग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2022 1:35 PM

Avoid 3 Mistakes While Walking : चालायला जाताना काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. तरच आपल्याला त्या चालण्याचा उपयोग होऊ शकतो.

ठळक मुद्देकोणत्याही वेळेला चालायला जाण्यासाठी चांगल्या पद्धतीचे बूट घालणे केव्हाही चांगले. व्यायाम म्हणून चालत असाल तर मोबाइल, मित्रमंडळी यांची सोबत अनावश्यक

आपल्याला दिवसभर घरातले काम, ऑफीसचे काम, बाहेरची इतर कामे यामुळे व्यायामाला वेळ होत नाही. मात्र व्यायाम करायला हवा हे आपल्याला कळत असते. अशावेळी व्यायामाचा सर्वात सोपा म्हणजे चालायला जाण्याचा पर्याय स्वीकारला जातो. कधी सकाळी लवकर उठून तर कधी संध्याकाळी काम आटोपल्यावर नाहीतर रात्री झोपताना २० ते ३० मिनीटे चालण्याचा व्यायाम केला जातो. चालल्यामुळे हलके वाटते, फ्रेश वाटते, शरीराची थोडी हालचाल झाल्याने खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते. मात्र असे असले तरी चालायला जाताना काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. तरच आपल्याला त्या चालण्याचा उपयोग होऊ शकतो. पाहूयात चालताना कोणत्या चुका टाळायला हव्यात (Avoid 3 Mistakes While Walking)

(Image : Google)

१. मोबाईलवर बोलणे किंवा गाणी ऐकणे

कोणतीही गोष्ट करताना आपलं त्यामध्ये पूर्णपणे लक्ष नसलं की ती गोष्ट करायची म्हणून केली जाते. आपण चालताना फोनवर बोलत असू किंवा गाणी ऐकत असू तर आपलं लक्ष त्याकडे असते आणि चालण्याकडे आपले फारसे लक्ष राहत नाही. त्यामुळे चालण्यावर त्याचा परिणाम होतो आणि व्यायाम म्हणून त्याचा म्हणावा तितका उपयोग होत नाही. त्यामुळे व्यायाम करताना शक्यतो इतर कोणत्याही गोष्टीवर लक्ष असू नये असे तज्ज्ञांकडूनही वारंवार सांगितले जाते. 

२. एकटे न चालता कोणाच्या सोबत चालणे 

आपण एकटे चालत असलो तर आपण आपल्या स्पीडने चालत राहतो. मात्र दुसऱ्या कोणासोबत चालायचे असेल तर आपल्याला त्या व्यक्तीच्या स्पीडशी जुळवून घेत चालावे लागते. त्यामुळे आपला व्यायामाचा उद्देश बाजूला राहतो. तसेच चालताना कोणी सोबत असेल तर नकळत बऱ्याच गप्पा मारल्या जातात आणि मग रमतगमत, थोडे निवांत चालले जाते. पण त्याचा शरीराला म्हणावा तितका उपयोग होत नाही. व्यायाम म्हणून चालत असताना त्यामध्ये एकप्रकारचा स्पीड असणे आवश्यक असल्याने शक्यतो एकटे चालणे केव्हाही चांगले.

(Image : Google)

३. पादत्राणे

अनेकदा आपण दिवसाच्या कोणत्याही वेळेला चालायला जातो. त्यामुळे अशावेळी पटकन जाऊन चालून येणे याला आपल्याला प्राधान्य द्यायचे असते. अशावेळी घाईत जाताना आपण चालण्यासाठी आवश्यक असणारे बूट घालायचा कंटाळा करतो. कधी स्लीपर, कधी सँडल अशी पादत्राणे आपण चालायला जाताना वापरतो. मात्र व्यायाम म्हणून चालताना एका लयीत चालणे आवश्यक असते. अशावेळी इतर पादत्राणांनी पायांना ताण येऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही वेळेला चालायला जाण्यासाठी चांगल्या पद्धतीचे बूट घालणे केव्हाही फायदेशीर. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यलाइफस्टाइल