प्रमाणापेक्षा वजन वाढलं की लोकं तुम्हाला, ''किती जाड झाली आहेस'', ''तू ना वजन कमी कर खूप सुंदर दिसशील'', ''पोट - कंबरेचा भाग बघ किती वाढत चाललाय'', ही वाक्य इतरांकडून तुम्हाला हमखास ऐकावी लागत असेल. वाढलेलं वजन कमी करणं हे खरंच खायचं काम नाही. अनेक जण वजन कमी करण्यासाठी विविध सल्ले देतात. परंतु, आपल्या शरीराला कोणतं डाएट व वर्कआउट सूट होईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे.
वजन कमी करत असताना एक समस्या सतत भेडसावते, ती म्हणजे पोटाची चरबी. ही चरबी कमी करण्यासाठी प्रचंड घाम गाळावा लागतो. काहींचे हात - पाय सडपातळ पण पोटाच्या वाढलेल्या आकारामुळे त्रस्त असतात. पोटाची चरबी कमी करायची असेल तर, हिरड्याच्या पावडरचा वापर करून पाहा(Ayurveda tips to burn belly fat and lose weight naturally).
यासंदर्भात, निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ.निताशा गुप्ता यांनी पोटाची चरबी कमी करण्याचा उपाय सांगितला आहे. त्या म्हणतात, ''पोट तंदुरुस्त ठेवणं फार गरजेचं आहे. कारण इथूनच सर्व आजार सुरू होतात. हा आजार तुमच्या शरीराला आतून हानी पोहोचवू शकतात, ज्यामुळे तुम्ही एखाद्या मोठ्या आजाराला बळी पडू शकता, त्यामुळे पोटाची चरबी करा.''
व्यायामाला वेळ नाही, डाएटही जमत नाही? फक्त २ टिप्स, वजन होईल कमी- हे सोपं रोज करा
त्या पुढे म्हणतात, ''हिरडाचे सेवन केल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत मिळते. हा घरगुती देशी उपाय पोटाची व कंबरेची चरबी कमी करते.''
या उपायाचा वापर कसा करावा
सर्वप्रथम, हिरडाची बारीक पावडर घ्या.
जर तुमच्याकडे पावडर नसेल, तर घरीच हिरडाची बारीक पावडर तयार करून घ्या.
आता एका ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या, त्यात अर्धा चमचा हिरडाची पावडर मिक्स करा.
या पेयाचे सेवन रिकाम्या पोटी सकाळी करायचे आहे.
पोटातील अतिरिक्त चरबी होईल कमी
चाळीशीनंतर महिलांचं वजन का वाढतं? वय वाढलं की वजन वाढतंच का? तज्ज्ञ सांगतात, एक उपाय
हिरडाच्या पावडरचा वापर केल्याने पोटाचे आरोग्य सुधारते. हे पेय पचन गतिमान करते व बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम देते. त्याचबरोबर या उपायाने पोटातील गॅस सहस पास होते. ज्यामुळे पोट फुगण्याची समस्येचा त्रास होत नाही.
हिरडाचे इतर फायदे
दम्याच्या लक्षणांपासून आराम
मूळव्याध्याची समस्या छळत नाही
खोकल्यापासून आराम
उलट्यांवर रामबाण उपाय
त्वचेच्या इन्फेक्शनपासून सुटका.