Lokmat Sakhi >Fitness > एका आठवड्यात वाढलेली पोटाची चरबी घटवतील ३ आयुर्वेदीक टिप्स; सुडौल फिगल दिसेल

एका आठवड्यात वाढलेली पोटाची चरबी घटवतील ३ आयुर्वेदीक टिप्स; सुडौल फिगल दिसेल

Ayurvedic Remedies for Losing Belly Fat : नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थच्यामते ७ दिवसात तुम्ही 0.45-1.36 किलोग्राम वजन कमी करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 09:54 AM2023-05-03T09:54:38+5:302023-05-03T11:21:45+5:30

Ayurvedic Remedies for Losing Belly Fat : नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थच्यामते ७ दिवसात तुम्ही 0.45-1.36 किलोग्राम वजन कमी करू शकता.

Ayurvedic Remedies for Losing Belly Fat : Ayurveda expert on effective hacks to lose belly fat | एका आठवड्यात वाढलेली पोटाची चरबी घटवतील ३ आयुर्वेदीक टिप्स; सुडौल फिगल दिसेल

एका आठवड्यात वाढलेली पोटाची चरबी घटवतील ३ आयुर्वेदीक टिप्स; सुडौल फिगल दिसेल

पर्सनॅलिटी चांगली हवी असेल तर बेली फॅटसुद्धा कमी असणं गरजेचं आहे. लठ्ठपणा वाढल्यास हे टाईप-२ डायबिटीस, हार्ट डिजीस, स्ट्रोक, कोलन कॅन्सर सारखे  गंभीर आजार होऊ शकतात. (Lose Belly Fat The Ayurveda Way)  तुम्हाला जितका वेळ वजन वाढवण्यासाठी लागतो तितकाच वेळ वजन कमी करण्यासाठीही लागतो ३ आयुर्वेदीक उपाय तुमचं काम अधिक सोपं करू शकतात. यामुळे नैसर्गिकरित्या वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. (Natural Weight Loss in One Week) 

तज्ज्ञ सांगतात की एका आठवड्यात वजन कमी करणं शक्य आहे पण यात योग्य संतुलन असणं गरजेचं आहे. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थच्यामते ७ दिवसात तुम्ही 0.45-1.36 किलोग्राम वजन कमी करू शकता जवळपास १ टक्का वजन कमी करणं हेल्दी वजन मेंटेन ठेवण्याप्रमाणे आहे. (Ayurveda expert on effective hacks to lose belly fat)

आयुर्वेदीक उपायांसह वेट ट्रेनिंग करा

कार्डीओ वर्कआऊटनं जास्तीत जास्त कॅलरीज बर्न करता येतात. वेट ट्रेनिंग केल्यानं संपूर्ण शरीरातील कॅलरीज बर्न होण्यात मदत होते. यामुळे पटापट वजन कमी होतं. बेली फॅट कमी करण्यासाठी आयुर्वेदीक उपायांसह वेट ट्रेनिंग सुरू केल्यास १ आठवड्यात तुम्ही वजन कमी करू शकता.

१) तेल आणि साखर चरबी वाढण्यासाठी सगळ्यात जास्त जबाबदार असतात. म्हणूनच वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असताना  या दोन्ही पदार्थांवर नियंत्रण ठेवा. यामुळे ७ दिवसात नॅच्युरल वेट लॉस होण्यास मदत होईल. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार Dharishah Ayurveda चे फाऊंडर आणि आयुर्वेद एक्सपर्ट Rajinder Dhamija यांनी सांगितले की, त्रिफला पावडरमध्ये पोटावरची चरब कमी करणारे घटक असतात. म्हणूनच रात्री झोपण्याआधी १ ग्लास कोमट पाण्यात त्रिफळा पावडर मिसळून प्या. यामुळे पोट साफ होण्यास आणि वजन कमी होण्यास मदत होईल.

हाडांमध्ये जमा झालेलं युरीक ॲसिड बाहेर काढेल १ पदार्थ: नियमित खा, किडनी स्टोनही टळेल

२) आयुर्वेदात आल्याला पचन आणि मेटाबॉलिझ्म वाढवणारा घटक मानले जाते.  आल्याचा चहा प्यायल्यानं पटापट वजन कमी होतं. फक्त यासाठी तुम्हाला चहामध्ये दूध घालायचं नाहीये. आलं १० मिनिटं पाण्यासह उकळून त्यात मध आणि लिंबाचा रस घालून हा चहा घ्या.

डायबिटीसच्या भितीनं गोड का सोडायचं? ७ गोष्टी करा, दिवसभर शुगर कंट्रोलमध्ये राहील शुगर

३) मेटाबॉलिझ्म वाढवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाण्याचे सेवन करा. लिंबातील सिट्रिक एसिड फॅट्स कमी करतात. कोमट पाण्यासह लिंबाच्या रसाचे सेवन केल्यास तब्येतही चांगली राहते. 

Web Title: Ayurvedic Remedies for Losing Belly Fat : Ayurveda expert on effective hacks to lose belly fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.