Join us  

सकाळी उठल्या उठल्या ढसाढसा पाणी पिणं योग्य की अयोग्य ? आयुर्वेदिक तज्ज्ञ सांगतात, तसे करावे की नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2023 2:33 PM

THE CORRECT WAY OF DRINKING WATER AS PER AYURVEDA : अनेकजण सकाळी उठल्याउठल्या पाणी पितात पण तसं करणं योग्य की अयोग्य?

आपल्यापैकी बऱ्याचजणांना सकाळी उठून कोमट पाणी पिण्याची सवय असते. दररोज आपण सकाळी उठल्यानंतर एक ते दिड लिटर पाणी नेहमी उपाशी पोटी पितोच. सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत असे म्हटले जाते. यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि मेटाबॉलिजम वाढण्यास मदत मिळते असे सांगण्यात येते, मात्र हे खरं आहे का ? सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी पाणी पिणे हे खरंच योग्य आहे का ? खरंतर असे पाहता आयुर्वेदानुसार, सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी असे पाणी पिणे हे योग्य नाही. आयुर्वेदात, सकाळी उपाशीपोटी अशा पद्धतीने पाणी पिण्याचा असा कोणताही नियम नाही असे डॉ. दीक्षा भावसार यांनी आपल्या इंस्टग्राम व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

'पाणी पिणे' हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. पाणी पिण्यावर आपल्या संपूर्ण शरीराचे चक्र अवलंबून असते. पाणी शरीराच्या अवयवांचे आणि ऊतींचे संरक्षण करते आणि शरीरातील पेशींना पोषक आणि ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत करते. दररोज मुबलक पाणी पिण्याने रोगांशी लढण्यास मदत होते, म्हणूनच योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. परंतु आयुर्वेदानुसार पाणी कधी व किती प्रमाणात प्यावे याचे काही नियम सांगितले आहेत, ते पाहूयात(Ayurvedic rules to drink water that you must know).

आयुर्वेदानुसार, सकाळी उपाशीपोटी पाणी पिणे योग्य की अयोग्य ? 

 डॉ. दीक्षा भावसार, यांनी आपल्या इंस्टाग्राम व्हिडीओमध्ये, आयुर्वेदानुसार पाणी पिण्याचे काही नियम सांगितले आहेत. बरेचजण सकाळी उठल्यावर उपाशी पोटी एक ते दिड लिटर पाणी पितात हे आयुर्वेदानुसार चुकीचे आहे. सकाळी उठल्यावर सर्वातआधी पाणी पिणे असा कोणताही नियम आयुर्वेदात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आयुर्वेदानुसार सकाळी इतके पाणी पिणे योग्य नसून आरोग्याला फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक पोहचवते, असा सल्ला त्यांनी दिला आहे.  सकाळी उठल्यावर नेमके किती पाणी प्यावे, कधी पाणी प्यावे याबाबत त्यांनी अधिक मार्गदर्शन केले आहे. 

घोट - घोट पाणी पिण्याचा आहे खास नियम, लठ्ठपणा ते डिहायड्रेशन पर्यंतच्या समस्या होतील दूर...

सिधे रस्ते की उलटी चाल! डोकं फारच भंजाळलं, स्ट्रेस वाढला तर १ सोपा उपाय...

सकाळी उपाशीपोटी पाणी पिणे अयोग्य का मानले जाते ? 

डॉक्टरच्या मते जेव्हा सकाळी उठल्यानंतर आपण लगेचच उपाशी पोटी अधिक पाणी पितो तेव्हा आपल्या शरीरातील पचन अग्नी अत्यंत मंद होतो. कारण सकाळी आपल्या शरीरातील पचन अग्नी हा आधीपासूनच मंद झालेला असतो. जेव्हा आपण पाणी पिता तेव्हा या पाण्यामुळे पचन अग्नी मंद करण्याचे काम केले जाते. असे असले तरीही जेव्हा आपण कोमट पाणी पितो तेव्हा यामुळे  मेटाबॉलिजम आणि पचनक्रिया अधिक चांगली होण्यास मदत मिळते. जास्त थंड पाणी हे मेटाबॉलिजमला नुकसानदायी ठरते. तसेच थंड पाणी पिण्याची ही सवय लिव्हर, किडनी आणि मेंदूच्या नसांवरही दबाव आणून नुकसान पोहचवते. यामुळे नर्व्हस सिस्टिम प्रभावित होते आणि त्रास होतो.

पाणी चुकीच्या रीतीने प्यायल्यानेही होते अपचन, पहा पाणी नेमके कसे प्यावे, केव्हा प्यावे ?

सकाळी उठल्या उठल्या प्या १ ग्लास डिटॉक्स वॉटर, दिवसभर एनर्जी भरपूर-थकवा गायब...

मग आयुर्वेदानुसार नक्की पाणी कोणत्या पद्धतीने प्यावे ? 

१. आयुर्वेदानुसार, एकदम एकाच वेळी एक ते दिड लिटर पाणी पिणे हे चुकीचे आहे. एकदम एकावेळी पाणी पिऊ नये तर थोड्या थोड्या वेळाने घोट घोट करत पाणी पिणे योग्य आहे. यासोबतच सकाळी उठल्यावर लगेच एक ते दिड लिटर पाणी पिण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतेनुसार त्यांना जेवढे जमेल तेवढेच पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. 

२. आयुर्वेद सकाळी उठल्यानंतर केवळ एक ग्लास कोमट पाणी प्यावे असा सल्ला देतं. एक लिटर किंवा त्यापेक्षा अधिक पाणी प्यावे असे आयुर्वेदात कुठेही सांगितलेले नाही. 

३. आयुर्वेदानुसार, भरपूर पाणी एकत्र पिण्यापेक्षा एक - एक घोट घेत पाणी प्यावे. ते देखील केवळ १ ग्लास सकाळी उठल्यानंतर पाणी कोमट करून प्यावे. या प्रक्रियेला आयुर्वेदात 'उष्णपान' असे म्हणतात. 

पोटावरील वाढत्या चरबीने हैराण ? ५ सोपे उपाय, पोटावरील चरबी होईल दिसेनाशी...

पाणी पिण्याबद्दल डॉक्टर अधिक काय सांगतात... 

चांगली त्वचा, रोगप्रतिकारक शक्ती, पचनक्रिया यासाठी सकाळी उठल्यानंतर सर्वातआधी भरपूर पाणी प्यायला हवे, असा काही नियम आयुर्वेदात नाही. जर आपण लिटरभर पाणी प्याल तर दिवसभर आपले पोट फुगल्यासारखे वाटू शकते, तसेच यामुळे पचनशक्ती कमी होऊ शकते आणि कफ दोष वाढवू शकतो. पाणी हे महत्त्वाचे आहेच आणि संपूर्ण दिवसभरात ते पुरेशा प्रमाणात पिणे आवश्यक आहेच परंतु अधिक प्रमाणात पिणे योग्य नाहीच. आपल्या शरीराला पाण्याची कधी गरज असते आणि अन्नाची कधी गरज असते हे आपल्याला आपोआप कळते. आपण आपल्या शरीराचे ऐकून त्यानुसार आहार करणे गरजेचे आहे असेही यामध्ये डॉ. दीक्षा यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स