पोटाची चरबी कमी करण्यासाठी लोक व्यायाम, योगा करतात. (Fat Loss Tips) पण शरीराच्या विशिष्ट ठिकाणी जमा झालेली चरबी घटवणं खूपच कठीण असतं. जसं की काही जणांच्या पोटावर तर काहींच्या कंबरेवर चरबीचे प्रमाण वाढते. हात, पाय, डबल चीन किंवा बेली फॅट लॉस करणं सोपं असतं. तुलनेनं बॅक फॅट कमी करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. (4 yoga asanas to reduce back fat and shape your body)
तुमच्या पाठीवरही अतिरिक्त चरबी असेल आणि तुम्हाला ती कमी करायची असेल तर योगाच्या मदतीने तुम्ही पाठीवरची चरबी काढून टाकू शकता. काही सोप्या योगासनांच्या मदतीने तुम्ही शरीराला योग्य आकार देऊ शकता. या योगासनांसाठी तुम्हाला नियमित फक्त पाच मिनिटे द्यावी लागतील. (Back fat loss exercise at home)
धनुरासन
हे आसन करण्यासाठी पोटावर झोपा. गुडघे वाकवून, तळव्याचे टोक धरा. नंतर दोन्ही पाय आणि हात शक्य तितक्या उंच करा. वर पाहताना, काही काळ या स्थितीत रहा. नंतर आधीच्या स्थितीत परत या.
पादहस्तासन
पाद हस्तासन करण्यासाठी पाय सरळ उभे राहा फोटो दाखवल्याप्रमाणे खाली वाका. श्वास आत घ्या आणि श्वास सोडा, पाठीचा कणा सरळ ठेवा, गुडघे आणि हात सरळ ठेवून पुढे वाका. आपले हात जमिनीवर ठेवा किंवा घोट्यांना स्पर्श करा.
शरीरातलं बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारी भाजी, रोज खा-बीपी वाढण्याचा त्रासही होईल कमी
मर्कट आसन
हे आसन करण्यासाठी पाठीवर झोपताना दोन्ही हात खांद्याच्या खाली ठेवा. दोन्ही पाय जोडून हातांवर जोर देऊन वर या. आता कमरेपासून खालचा भाग वर घ्या. या स्थितीत 10 ते 20 सेकंद राहिल्यानंतर पुन्हा पूर्वस्थितीत या.
अंथरुणावर पडल्या पडल्या ढाराढूर झोपाल; १ इफेक्टीव्ह उपाय, रात्रभर तळमळत राहावं लागणार नाही..
राजकपोतासन
जमिनीवर बसा. गुडघे, नितंब आणि दोन्ही हात खांद्याच्या रेषेच्या थोडे पुढे असावेत. नंतर डावा पाय थोडा मागे सरकवा, तसेच उजवा पाय मागून सरळ करा. नंतर दीर्घ श्वास घ्या आणि सरळ हात वर करा, कोपर वाकवा आणि श्वास सोडताना पाय धरा. या आसनात श्वासोच्छवास साधारणपणे 15-20 सेकंद थांबवा आणि नंतर श्वास सोडताना सामान्य स्थितीत