Lokmat Sakhi >Fitness > प्रेग्नन्सी, बाळंतपण किंवा वाढलेलं वय- यामुळे कंबर आखडली? भाग्यश्री सांगतेय एक सोपा व्यायाम 

प्रेग्नन्सी, बाळंतपण किंवा वाढलेलं वय- यामुळे कंबर आखडली? भाग्यश्री सांगतेय एक सोपा व्यायाम 

Fitness Tips By Actress Bhagyashree: प्रेग्नन्सी, बाळंतपण, सी- सेक्शन यामुळे कंबर आखडून जाते. वाढत्या वयामुळेही हा त्रास होतोच. तो कमी करून हिप मोबिलीटी (loss of hip mobility) कशी वाढवायची, याविषयी भाग्यश्रीने शेअर केलाय तिचा स्वत:चा अनुभव.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2023 02:12 PM2023-01-11T14:12:50+5:302023-01-11T14:13:43+5:30

Fitness Tips By Actress Bhagyashree: प्रेग्नन्सी, बाळंतपण, सी- सेक्शन यामुळे कंबर आखडून जाते. वाढत्या वयामुळेही हा त्रास होतोच. तो कमी करून हिप मोबिलीटी (loss of hip mobility) कशी वाढवायची, याविषयी भाग्यश्रीने शेअर केलाय तिचा स्वत:चा अनुभव.

Back pain and loss of hip mobility due to pregnancy and C- section? Actress Bhagyashree suggests Spider Lunges exercise | प्रेग्नन्सी, बाळंतपण किंवा वाढलेलं वय- यामुळे कंबर आखडली? भाग्यश्री सांगतेय एक सोपा व्यायाम 

प्रेग्नन्सी, बाळंतपण किंवा वाढलेलं वय- यामुळे कंबर आखडली? भाग्यश्री सांगतेय एक सोपा व्यायाम 

Highlightsवेगवेगळ्या कारणांमुळे हिप्स भागातील स्नायूंची हालचाल कमी होत जाते. याकडे वेळीच लक्ष दिलं नाही, तर ते अधिक गंभीर स्वरुपाचं होत जातं.

बाळंतपणानंतर अनेक जणींना कंबरदुखीचा खूप त्रास होतो. कंबर, हिप्स (loss of hip mobility), पाय या भागातले स्नायू आखडून गेल्यासारखे वाटतात. कारण गरोदरपणात या भागाची पुरेशी हालचाल झालेली नसतेच. त्यामुळे स्नायुंमध्ये एक प्रकारचा तटस्थपणा येतो. प्रेग्नन्सी किंवा बाळंपणानंतरच (pregnancy and C- section) हा त्रास होतो, असं नाही. काही जणींना पस्तिशी- चाळिशीनंतरही असा त्रास जाणवतो. कारण शरीराला व्यायामाची पुरेशी सवय नसल्याने मग स्नायूंची लवचिकता कमी होत जाते. असं झालं तर नेमका कोणता व्यायाम करावा, याविषयी अभिनेत्री भाग्यश्री (Actress Bhagyashree) हिने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

नेमका कोणता व्यायाम करतेय भाग्यश्री?
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री भाग्यश्री म्हणतेय की Hip mobility वाढवणे किंवा त्यावर अधिक फोकस करणे, हे तिचं यावर्षीचं फिटनेस टार्गेट आहे.

मान- पाठ सारखी दुखते? कंबरदुखी पण आहे? करून बघा मलायका अरोरा सांगतेय तसा ट्विस्ट योगा... 

वेगवेगळ्या कारणांमुळे हिप्स भागातील स्नायूंची हालचाल कमी होत जाते. याकडे वेळीच लक्ष दिलं नाही, तर ते अधिक गंभीर स्वरुपाचं होत जातं. म्हणूनच त्यासाठी काही साधे- सोपे व्यायाम नियमितपणे करणे गरजेचे आहे. यावर उपाय म्हणून भाग्यश्रीच्या फिटनेस ट्रेनरने तिला स्पायडर लंजेस नावाचे वर्कआऊट (Spider Lunges exercise) सांगितले आहे. 

 

कसे करायचे स्पायडर लंजेस?
१. हा व्यायाम करण्यासाठी दोन्ही तळहात आणि दोन्ही तळपाय जमिनीवर टेकवून त्यावर संपूर्ण शरीराचा भार पेलण्याचा प्रयत्न करावा.

उंची कमी आहे? कपडे खरेदी करताना लक्षात ठेवा ३ टिप्स, नक्कीच आहे त्यापेक्षा उंच दिसाल 

२. यानंतर पहिल्यांदा उजवा पाय गुडघ्यात वाकवून पुढे घ्यावा आणि उजवा तळपाय उजव्या तळहाताच्या शेजारी बाहेरील बाजूने ठेवावा. यावेळी मान सरळ असावी आणि नजर समोरच्या भिंतीवर स्थिर करावी. ही स्थिती ४ ते ५ सेकंद टिकवून ठेवावी. त्यानंतर उजवा पाय मागे आणि डावा पाय तशाच पद्धतीने पुढे घ्यावा.

३. अशा प्रकारे एकानंतर एक दोन्ही पायांनी प्रत्येकी १०- १० वेळा हा व्यायाम करावा. 
 

 

Web Title: Back pain and loss of hip mobility due to pregnancy and C- section? Actress Bhagyashree suggests Spider Lunges exercise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.