सध्या लट्ठपणा हा विषय फार कॉमन झाला आहे. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे काहींचे वजन झपाट्याने वाढते. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी महिला अनेक गोष्टी करतात. महिलांचे वजन अनेक कारणांमुळे वाढते. मासिक पाळीची समस्या, प्रेग्नंसी, असो या इतर काही गोष्टी. प्रत्येकाच्या शरीरात विविध भागात फॅट जमा होते.
वजन कमी करण्यासाठी महिला व्यायाम शाळेत जाऊन तासंतास घाम गाळतात, याशिवाय योगासना देखील करतात. शरीरातल्या खालच्या भागात जमा झालेला फॅट कपड्यांद्वारे झाकले जाते. मात्र, हेच फॅट जर पाठ आणि मानेवर जमा होते तेव्हा ते कुबड्यासारखे दिसून येते. मानेची चरबी किंवा कुबड लपविणे फार कठीण आहे. कारण आजकाल स्त्रिया बहुतेक बसून काम करतात. मग ते ऑफिसचे काम असो किंवा घरातील कोणतेही काम.
तासंतास बसल्यामुळे महिलांना पाठदुखीची समस्या भेडसावते, तर काही महिलांना मानेच्या संरचनेची समस्या भेडसावत असते. कारण चुकीच्या बसण्यामुळे पाठीवर भरपूर चरबी जमा होते आणि ही समस्या अधिकतर प्लस साइज महिलांमध्ये दिसून येते. यासंदर्भात वरिष्ठ फिजिओथेरपिस्ट डॉ. हितेश खुराना सांगतात, ''आजकालच्या महिलांमध्ये मानेवरील कुबडेची समस्या वाढत चालली आहे. ही स्थिती सुधरवण्यासाठी काही योगासना आणि व्यायाम कामी येतील. याच्या नियमित सरावामुळे महिलांमध्ये विशेष बदल घडून येईल.''
मानेवरील चरबी - कुबड घालवण्यासाठी करा हे व्यायाम
पुश - अप्स
मानेवरील चरबी कमी करण्यासाठी आपण पुश - अप हा व्यायाम करू शकता. नियमितपणे पुश - अप केल्याने शरीरातील चरबी कमी करण्यास मदत होईल. या व्यायामामुळे आपल्या शरीराला एक चांगला आकार प्राप्त होतो, तसेच शरीरातील लवचिकतेत वाढ होते. नियमित पुश - अप केल्याने छाती आणि मानेवर अधिक परिणाम होतो, ज्यामुळे मान आकारात येऊ लागते.
ग्लूट्स एक्सरसाईज
मानेवरील चरबी कमी करण्यासाठी आपण दिनचर्येत ग्लूट व्यायामाचा समावेश करू शकता. कारण हा व्यायाम पाठीच्या खालच्या भागातील वेदना कमी करण्यासह मानेवरील चरबी कमी करण्यास मदत करेल. हा व्यायाम ग्लूट्स मजबूत आणि सक्रिय करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
भुजंगासन
मानेची चरबी कमी करण्यासाठी भुजंगासन उपयुक्त ठरेल. या आसनाला कोब्रा पोज देखील म्हणतात. भुजंगासन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. या आसनाच्या नियमित सरावाने छाती, खांदे, मान आणि मस्तकाचा भाग सुदृढ व मजबूत बनतो. या आसनाच्या नित्य सरावाने पाठीचे दुखणे व इतर विकार नष्ट होतात. यासह शरीरातील चरबी तर कमी होईलच पण मानेचा आकारही कमी होतो.