सध्याच्या स्थितीत हार्ट अटॅक येणं ही खूपच कॉमन समस्या बनली आहे. सर्वच वयोगटातील लोकांना जीवघेण्या हार्ट अटॅकचा सामना करावा लागत आहे. (Bad habit harmful for cardiovascular system and causes heart attac many times) जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार ही समस्या जगभरातील मृत्यूचं सगळ्यात मोठं कारण आहे. (Causes of heart attack)
यामुळे जगभरात जवळपास १ कोटी ८० लाख लोकांना आपला जीव गमवावा लागतो. एनएचएसच्या रिपोर्टनुसार हार्ट अटॅकमागे हृदयाच्या नसा कमकुवत होणं, ब्लॉकेज किंवा कमकुवतपणा ब्लड फ्लो कमी होणं या गोष्टी कारणीभूत ठरतात. हे आपल्याला त्वरीत बदलायला हवं. (Heart Attack Symptoms, Causes, Treatment and Prevention) डॉ. वनीता अरोरा यांनी एका हिंदी वेब पोर्टलशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. हार्ट अटॅकच्या जोखिम घटकांमध्ये डायबिटीस, स्ट्रेस-डिप्रेशन, हाय ब्लड प्रेशर, स्मोकींग, फॅमिली हिस्ट्री, उच्च कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा, स्मोकींग या ७ कारणांचा समावेश होता.
कोलेस्टेरॉल वाढवणारे पदार्थ खाऊ नका
कोलेस्टेरॉल हा एक चिकट पदार्थ असतो जो हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. हा पदार्थ नसांमध्ये जमा झाल्यानं रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही. फ्राईड फूड, रेड मीट, डेअरी प्रोड्क्ट, जंक फूड इत्यादींमध्ये घातक फॅट्स असतात. ज्यामुळे कोलेस्टेरॉल वाढू शकतं.
फक्त कपभर रवा वापरुन नाश्त्याला करा कुरकुरीत सुजी बाईट्स! चटपटीत-परफेक्ट रेसिपी
शुगर वाढवणारे पदार्थ
डायबिटीसमुळे फक्त किडनी खराब होत नाही तर नसासुद्धा कमकुवत होतात. यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. म्हणूनच गोड, अति खारट पदार्थ, आर्टिफिशिल शुगर, व्हाईट ब्रेड, मध, तांदूळ खाणं टाळायला हवं.
ब्लड प्रेश वाढवणारे पदार्थ खाऊ नका
हाय ब्लड प्रेशरमुळे हृदयावर अत्याधिक तणाव पडतो. पॅकेज फूडमध्ये जास्त प्रमाणात सोडीयम आणि मीठयुक्त पदार्थ असतात.
सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापरामुळे खरंच कॅन्सर होतो का? डॉक्टर सांगतात, काय खरं आणि काय गैरसमज..
व्यायाम न करण्याची सवय
ज्या लोकांना जास्त व्यायाम करण्याची सवय नसते त्यांना लठ्ठपणाचा धोका असतो. अशावेळ नसांमध्ये फॅट जमा होऊन नसा बंद होऊ शकतात. हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. म्हणून रोज फिजिकल एक्टिव्हीज आणि व्यायाम करा.
स्मोकींग
हार्ट अटॅकपासून बचावसाठी धुम्रपानाची सवय वेळीच सोडा. यामुळे हृदयाच्या नसा कमकुवत होतात आणि शरीरातील विषारी पदार्थ वाढतात.