Lokmat Sakhi >Fitness > वीकेंडला तुम्ही फक्त आराम करता? करिना कपूरचा व्हायरल व्हिडिओ; वीकेंडला कुणी असं करतं का?

वीकेंडला तुम्ही फक्त आराम करता? करिना कपूरचा व्हायरल व्हिडिओ; वीकेंडला कुणी असं करतं का?

Balancing Workout by Kareena Kapoor : २ मुलांची आई असलेली आणि वयाची चाळीशी पूर्ण केलेली करीना आजही तितकीच फिट आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2023 01:21 PM2023-01-23T13:21:33+5:302023-01-23T13:30:43+5:30

Balancing Workout by Kareena Kapoor : २ मुलांची आई असलेली आणि वयाची चाळीशी पूर्ण केलेली करीना आजही तितकीच फिट आहे...

Balancing Workout by Kareena Kapoor : Do you just relax on the weekends? Kareena Kapoor Viral Video; Does anyone do this on weekends? | वीकेंडला तुम्ही फक्त आराम करता? करिना कपूरचा व्हायरल व्हिडिओ; वीकेंडला कुणी असं करतं का?

वीकेंडला तुम्ही फक्त आराम करता? करिना कपूरचा व्हायरल व्हिडिओ; वीकेंडला कुणी असं करतं का?

Highlightsशरीराचे सगळे वजन हातांवर येत असल्याने हे करणे नक्कीच कष्टाचे आहे.फिटनेस फ्रिक असलेली करीना पाहा कसा व्यायाम करते...

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री बेबो म्हणजेच करीना कपूर फिटनेसच्या बाबतीत कायमच जागरुक असते. उत्तम आरोग्य आणि फिगरसाठी बेबो कायम डाएटकडे आणि व्यायामाकडे विशेष लक्ष देत असल्याचे दिसते. करीना वेळ मिळतो तेव्हा आवर्जून व्यायाम करते हे आपल्याला तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून दिसून येते. म्हणूनच २ मुलांची आई असलेली आणि वयाची चाळीशी पूर्ण केलेली करीना आजही तितकीच फिट आणि तरुण दिसते. करीनाची फिटनेस ट्रेनर अंशुका परवानीही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर करीनाचे व्यायाम करतानाचे व्हिडिओ किंवा फोटो पोस्ट करत असते (Balancing Workout by Kareena Kapoor). 

(Image : Google)
(Image : Google)

अनेकदा करीना फॅट बर्न करण्यासाठी किंवा स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अतिशय अवघड असे व्यायामप्रकारही लिलया करताना दिसते. विशेष म्हणजे करीना योगा, कार्डीओ वर्कआऊट, मसल वर्कआऊट अशा विविध प्रकारचे व्यायाम करणे पसंत करते. काही दिवसांपूर्वी ती घरात व्यायाम करत असताना जेह तिच्या आजुबाजूला फिरत असल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. नुकताच करीनाच्या फिटनेसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये करीना चक्क हातांवर चालत असल्याचे दिसते. यावरुनच ती किती फिटनेस फ्रिक आहे हे आपल्याला दिसून येते. करीना कपूर टीम या तिच्या फॅनक्लब असलेल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. 

पाहा नेमका कोणता व्यायाम करते करीना? 

घराच्या गॅलरीमध्ये जमिनीवर हात ठेवून पाय स्लायडींगवर ठेवून करीना चक्क उलटी चालत आहे. पाहताना हा व्यायामप्रकार सोपा वाटत असला तरी प्रत्यक्षात मात्र तो तितका सोपा नाही. शरीराचे सगळे वजन हातांवर येत असल्याने हे करणे नक्कीच कष्टाचे आहे. मात्र करीना अतिशय उत्तम बॅलन्स राखत हा व्यायाम करत असल्याचे दिसते. फॅट बर्न करण्यासाठी, बॅलन्सिंगसाठी आणि मसल स्ट्रेंथ वाढण्यासाठी हा व्यायाम अतिशय उपयुक्त आहे. मात्र तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय तो करणे योग्य नाही. या पोस्टला करीनाच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक केले असून अनेकांनी त्यावर तिचे कौतुकही केले आहे. 

Web Title: Balancing Workout by Kareena Kapoor : Do you just relax on the weekends? Kareena Kapoor Viral Video; Does anyone do this on weekends?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.