Lokmat Sakhi >Fitness > किती बारीक आहेस, असे टोमणे मारतात लोक? ‘हे’ फळ खा पोटभर, खिशालाही परवडेल सहज

किती बारीक आहेस, असे टोमणे मारतात लोक? ‘हे’ फळ खा पोटभर, खिशालाही परवडेल सहज

Banana and Milk: A Simple and Easy Breakfast for Weight Gain : वजन वाढतच नाही म्हणून वैतागला असाल तर हा उपाय करुन पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2024 02:54 PM2024-06-25T14:54:23+5:302024-06-25T14:56:22+5:30

Banana and Milk: A Simple and Easy Breakfast for Weight Gain : वजन वाढतच नाही म्हणून वैतागला असाल तर हा उपाय करुन पाहा..

Banana and Milk: A Simple and Easy Breakfast for Weight Gain | किती बारीक आहेस, असे टोमणे मारतात लोक? ‘हे’ फळ खा पोटभर, खिशालाही परवडेल सहज

किती बारीक आहेस, असे टोमणे मारतात लोक? ‘हे’ फळ खा पोटभर, खिशालाही परवडेल सहज

वजन वाढतच नाही, कितीही खा, अंगी लागतच नाही (Weight Gain). असं आपण अनेकांकडून ऐकलं असेल. वजन वाढवण्यासाठी काय खायचं किंवा व्यायामाबाबत काय खबरदारी घ्यावी याबाबत अनेक गोष्टी लोकांना ठाऊक नसते (Milk and Banana). जर आपलं वजन वाढत नसेल तर, आहारात दूध आणि केळीचा समावेश करा. यामुळे फक्त वजन वाढत नाही तर, स्किनसाठीही फायदेशीर ठरते (Fitness).

केळ आणि दुधामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, फॉलिक ॲसिड, प्रोटीन, लोह, पोटॅशियम, फायबर आणि इतर अनेक पोषक घटक असतात. या सर्व पोषक घटकांमुळे स्नायू विकसित होतात आणि वजन वाढते. वजन वाढवण्यासाठी आहारात दूध आणि केळीचा समावेश कसा करावा? याची माहिती आहारतज्ज्ञ कामिनी सिन्हा यांनी दिली आहे(Banana and Milk: A Simple and Easy Breakfast for Weight Gain).

वजन वाढवण्यासाठी दूध आणि केळीचे फायदे

पचनक्रिया सुधारते

पचनक्रिया सुधारण्यासाठी दूध आणि केळी फायदेशीर ठरते. केळ्यामध्ये असलेले फायबर पचनक्रियेला गती देते. तसेच, अपचन आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येवर दूध आणि केळीचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. जर आपल्याला दूध आवडत नसेल तर, आपण दही खाऊ शकता. आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये केळी आणि दुधाचा समावेश करू शकता.

ना पाणी - ना साबण; अवघ्या २ मिनिटांत कंगवा स्वच्छ करण्याची पाहा सोपी ट्रिक; कंगवा दिसेल नव्यासारखा

स्नायू वाढण्यास मदत

केळी आणि दुधामध्ये असलेली प्रथिने, कार्ब्स आणि जीवनसत्त्वे स्नायू वाढवण्यास मदत करतात. यामुळे संपूर्ण शरीराचे स्नायू विकसित होतात. ज्यामुळे आपले वजन योग्यपद्धतीने वाढते. व्यायाम केल्यानंतरही आपण दूध आणि केळी खाऊ शकता.

थकवा दूर होते

बरेच लोक चुकीच्या पद्धतीने वजन वाढवण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे त्यांच्या शरीरातील चरबीचे प्रमाण वाढते परंतु शरीर आतून मजबूत होत नाही. अशा स्थितीत आपल्याला जर निरोगी पद्धतीने वजन वाढवायचं असेल तर, दूध आणि केळी खा.

तणाव दूर करण्यात मदत

दूध आणि केळी खाल्ल्याने तणाव बऱ्याच प्रमाणात कमी होतो. यामध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम, मेंदूशी संबंधित समस्या कमी करू शकतात.

पाळी तर अनियमित होतेच, त्यात मानेवर दिसतात ‘असे’ डाग; PCOSची २ लक्षणं वेळीच ओळखली नाही तर..

या प्रकारे केळी आणि दुधाचे सेवन करा

केळी आणि दुधाचे सेवन आपण अनेक प्रकारे करू शकता. यासाठी आपण सकाळच्या नाश्त्यात कॉन्फ्लेक्ससोबत केळी आणि दूध खाऊ शकता. याशिवाय दुपारी दही आणि केळी एकत्र सेवन करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी केळी, दूध आणि मध देखील खाऊ शकता. वजन वाढवण्यासाठी याचा आपल्याला खूप फायदा होईल.

Web Title: Banana and Milk: A Simple and Easy Breakfast for Weight Gain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.