Lokmat Sakhi >Fitness > बंदिश बँडीट्स फेम श्रेया चौधरीचे जबरदस्त वेटलॉस, म्हणाली 'या' अभिनेत्यामुळे वजन घटवू शकले..

बंदिश बँडीट्स फेम श्रेया चौधरीचे जबरदस्त वेटलॉस, म्हणाली 'या' अभिनेत्यामुळे वजन घटवू शकले..

Bandish Bandits Fame Actress Shreya Chaudhry's Inspiring Weight Loss Journey: बंदिश बँडीट्स या गाजलेल्या वेब सिरीजची अभिनेत्री श्रेया चौधरीने ज्या पद्धतीने वजन कमी केलं ते खरंच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2025 15:40 IST2025-01-04T11:59:09+5:302025-01-04T15:40:31+5:30

Bandish Bandits Fame Actress Shreya Chaudhry's Inspiring Weight Loss Journey: बंदिश बँडीट्स या गाजलेल्या वेब सिरीजची अभिनेत्री श्रेया चौधरीने ज्या पद्धतीने वजन कमी केलं ते खरंच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतं.

Bandish Bandits fame actress Shreya Chaudhry's inspiring weight loss journey  | बंदिश बँडीट्स फेम श्रेया चौधरीचे जबरदस्त वेटलॉस, म्हणाली 'या' अभिनेत्यामुळे वजन घटवू शकले..

बंदिश बँडीट्स फेम श्रेया चौधरीचे जबरदस्त वेटलॉस, म्हणाली 'या' अभिनेत्यामुळे वजन घटवू शकले..

Highlightsनव्या वर्षात वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार असाल तर श्रेयाचे उदाहरण नक्कीच डोळ्यासमोर ठेवू शकता.  

काही दिवसांपुर्वी आलेली बंदिश बँडीट्स ही वेबसिरीज अनेकांना प्रचंड आवडून गेली होती. त्यातील कलाकारांचा फ्रेश लूक आणि अतिशय श्रवणीय, सुरेल गाणी यामुळे ही वेबसिरीज खूप लोकप्रिय झाली. वेबसिरीजमधली अभिनेत्री श्रेया चौधरी हिने देखील तिच्या लूक्समुळे अनेकांचे लक्ष वेधून घेतले. अतिशय स्लिमट्रिम लूकमध्ये जबरदस्त हॉट दिसणारी ही अभिनेत्री काही वर्षांपुर्वी कशी होती याचे काही फोटो तिने स्वत:च सोशल मिडियावर शेअर केले आहेत. ते फोटो पाहून फोटोमध्ये दिसणाऱ्या दोघी खरंच एकच आहेत का हा प्रश्नही अनेकांना पडतो. कारण जुन्या फोटोमध्ये श्रेया अतिशय जाड दिसते आहे. तिने वजन कसं कमी केलं, स्वत:मध्ये हा बदल घडवून आणण्यासाठी नेमकं काय केलं याविषयी बघा ती स्वत:च काय सांगते आहे..(Bandish Bandits Fame Actress Shreya Chaudhry's Inspiring Weight Loss Journey)


 

श्रेयाने तिचे फोटो शेअर करताना असं सांगितलं आहे की तेव्हा मी जशी होते, तेव्हाही मी मला स्वत:ला खूप आवडायचे आणि आताचा माझा हा लूकसुद्धा मला खूप आवडतो. मला फक्त आणि फक्त फिट राहायचं होतं.

डिझायनर साडीवर शिवून घ्या सुहाना खानसारखे सुपरस्टायलिश ब्लाऊज, बघा एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स

त्यामुळे मी वजन घटवलं आणि स्वत:मध्ये हा बदल घडवून आणला. काही वर्षांपुर्वी मला काही मानसिक- शारिरीक त्रास, ताण-तणाव होते. त्यामुळे हे सगळं जर कमी करायचं असेल तर त्यासाठी वजन घटवणं खूप गरजेचं आहे, असा सल्ला मला डॉक्टर वारंवार द्यायचे. त्यामुळे मी निर्णय घेतला आणि नेटाने वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले.


 

श्रेया म्हणते की वजन कमी करण्याचा हा प्रवास सोपा नव्हता. पण त्यासाठी मात्र तिने नेहमीच हृतिक रोशनकडून (Hrithik Roshan) प्रेरणा घेतली. हृतिक हा तिचा खूप आधीपासूनच क्रश आहे. त्यानेही भरपूर वजन कमी करून स्वत:मध्ये खूप बदल घडवून आणला आहे.

डोक्यातला कोंडा कमी करणारे ५ सोपे घरगुती उपाय, कोंडा होईल गायब- केस वाढतील भराभर

हा सगळा प्रवास त्याने कसा केला याविषयी त्यानेच एकदा एका मुलाखतीतून माहिती दिली होती. श्रेया म्हणते त्याने त्यामध्ये सांगितलेले प्रत्येक वाक्य पक्के लक्षात आहे आणि तेच कायम डोळ्यासमोर ठेवून ती तिचा वेटलॉस प्रवास करत होती. श्रेयाने स्वत:मध्ये घडवून आणलेला हा बदल खरोखरच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकताे. नव्या वर्षात वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार असाल तर श्रेयाचे उदाहरण नक्कीच डोळ्यासमोर ठेवू शकता.  

 

Web Title: Bandish Bandits fame actress Shreya Chaudhry's inspiring weight loss journey 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.