एकदा वजन वाढलं की ते कमी करणं खूप कठीण होतं. आजकाल ऑनलाईन किंवा डॉक्टरच्या सल्ल्यानं वजन कमी करण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. सीडीसीच्या अहवालानुसार वजन वाढल्यानं हाय कोलेस्ट्रोल, हाय बीपी, टाईप ३ डायबिटीस, स्ट्रोक आणि हृदयाच्या आजारांचा धोका वाढतो (Health and fitness health care best home remedies) वजन कमी करण्यासाठी तुम्हाला काही घरगुती उपाय करू शकतात. (Belly fat in women) वजन कमी करण्यासाठी एप्पल साडर व्हिनेगर, ग्रीन टी, लिंबू आणि आलं असे रोजच्या वापरातले पदार्थ परिणामकारक ठरू शकतात. (Weight Loss Home Remedies) या सर्व नैसर्गिक घटकांमुळे केमिकल्सच्या वापराशिवाय नैसर्गिकरित्या वेटलॉस करता येतं.
1) सकाळची सुरुवात दोन ग्लास कोमट पाण्याने करा. सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
२) थोड्या वेळाने चहा घ्या. ग्रीन टी किंवा लेमन टी घेणे चांगले. जर तुम्ही चहा घेत असाल तर त्यासोबत दोन बिस्किटे किंवा टोस्ट जरूर घ्या, म्हणजे गॅसचा त्रास होणार नाही.
३) दर दोन तासांनी एक फळं खा. नेहमी हंगामी फळे घ्या आणि रोज रंगानुसार वेगवेगळी फळे खाण्याचा प्रयत्न करा. अनेक फळे एकत्र मिसळून घेऊ नका.
४) फळ खाल्ल्यानंतर दोन तासांनी दुपारचे जेवण घ्या. दुपारच्या जेवणात दोन चपात्या, डाळी, भाज्या, दही इत्यादी खावे. आठवड्यातून एकदा दुपारच्या जेवणात खिचडी खावी. आठवड्यातून एकदा फक्त फळे, रस आणि उकडलेल्या भाज्या घेण्याचा प्रयत्न करा. फळ आणि दुपारच्या जेवणात अंतर जास्त असल्यास ज्यूस घेऊ शकता.
५) जेवणानंतर दोन तासांनी, बेल सरबत, ताक किंवा कोणतेही पेय घ्या. किंवा हलका नाश्ता म्हणून सॅलड, सँडविच, पोहे, उपमा असे पदार्थ खाऊ शकता.
६) रात्रीचे जेवण वेळेत करा. रात्रीचे जेवण 8 ते 8:30 च्या दरम्यान करण्याचा प्रयत्न करा. रात्रीच्या जेवणात कोणतीही हंगामी भाजी आणि एक किंवा दोन चपात्या खा. रात्री चपात्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करा, त्याऐवजी अधिक भाज्या खा. खाल्ल्यानंतर दोन तासांनी एक कप नॉन-क्रिमी दूध घ्या.
७) जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह, हृदयविकार इत्यादीसारख्या गंभीर आजाराने ग्रासले असेल तर त्यांच्यासाठी या आहारामध्ये थोडासा बदल केला जाऊ शकतो. त्यामुळे कोणताही आहार पाळण्यापूर्वी एकदा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.