जर तुम्ही फुगलेल्या पोटामुळे आणि वाढत्या चरबीमुळे त्रस्त असाल आणि लवकरात लवकर कमी करू इच्छित असाल तर तुम्हाला यासाठी जिममध्ये जाण्याची गरज नाही. (How to lose belly fat fast) कारण जिममध्ये न जाताही तुमचे वजन कमी होऊ शकते. यासाठी तुम्हाला महागडी उत्पादनं घेण्याची गरज नाही किंवा कठीण व्यायाम किंवा योगासने करण्याची गरज नाही. त्याऐवजी, आपल्या दिनचर्येत हलके बदल करून, आपण काही दिवसात आपले वजन नियंत्रित करू शकता. (Belly fat weight loss without gym exercise drink water in the morning protein rich diet sun meditation)
अनेक अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की लठ्ठपणामुळे कर्करोग, मधुमेह, हृदयविकार इत्यादींचा धोका वाढतो. अशा स्थितीत, निरोगी दिनचर्याचे पालन करून आपण लठ्ठपणाच्या पकडीपासून दूर राहणे आणि निरोगी जीवन जगणे महत्वाचे आहे. (Belly fat weight loss without gym exercise) सकाळी केलेली ही साधी कामे तुम्हाला वाढत्या वजनाच्या ओझ्यापासून तर वाचवतीलच पण दिवसभर तुम्हाला सक्रिय आणि उत्साही देखील ठेवतील. येथे जाणून घ्या अशा कोणत्या गोष्टी आहेत. ज्या करून तुम्ही सहज वजन कमी करू शकता. (Weight lose Tips)
१) सकाळी गरम पाणी प्या
सकाळी दोन ग्लास पाणी प्या. शक्य असल्यास एक ग्लास गरम पाणी प्या. हे तुमच्या कॅलरी आणि चरबी जलद बर्न करेल. याशिवाय तुमचे शरीरही हायड्रेटेड राहील. लवकरच शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होईल आणि आकारात येईल.
२) हाय प्रोटिन नाश्ता
नाश्त्यात उच्च प्रथिनयुक्त पदार्थ घ्या. जसे अंडी आणि दूध. अनेक रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की हाय प्रोटीन फूड खाल्ल्याने तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही. यासोबतच लक्षात ठेवा की नाश्ता हा प्रसादासारखा नसून तो पोटभर असावा.
३) ऊन गरजेचं
शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की शरीरातील व्हिटॅमिन डीच्या पातळीचा वजनावरही परिणाम होतो. असे दिसून आले आहे की व्हिटॅमिन डी वाढते वजन कमी करण्यास मदत करते. त्यामुळे सकाळी सूर्यप्रकाशही अंगावर घ्या. त्यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरायला जा.
४) वजन तपासत राहा
वजन कमी करण्यासाठी, आपण आपले वजन वारंवार तपासण्याची सवय लावली पाहिजे, जेणेकरुन आपण वजन कमी करण्यास प्रवृत्त व्हाल.
५) मेडिटेशन
वजन कमी करण्यासाठी खूप कठीण व्यायाम आणि योगासने करण्याऐवजी रोज सकाळी ध्यान करण्याची सवय लावा. यामुळे हळूहळू पण तुमच्या वजनात फरक दिसू लागेल. केवळ तुमच्या वजनावरच नाही तर तुमच्या त्वचेवर आणि मानसिक आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो.