आजच्या काळात लोक वाढलेल्या वजनापेक्षा जास्त कशाची चिंता करत असतील तर ते त्यांच्या पोटाची किंवा कमरेच्या आजूबाजूला साचलेल्या चरबीची. पोटाची चरबी फक्त लठ्ठ लोकांच्याच शरीरावर येत नाही याउलट पातळ लोकांच्या कंबरेवरही ते पाहायला मिळते. सहसा महिलांच्या शरीरात अधिक दिसून येते. (Belly Fat Loss ) पण जेव्हा स्त्रिया रजोनिवृत्तीच्या अवस्थेत येतात, तेव्हा त्यांच्या पोटाची चरबी वाढण्याची शक्यता खूप जास्त असते. (What exercise burns the most belly fat?)
पोटाची वाढलेली चरबी डायबिटीस, रक्तदाब, हृदयविकार आणि श्वसनाचे आजार इत्यादी अनेक धोकादायक आजारांना कारणीभूत ठरू शकते. आयुर्वेदिक डॉक्टर दिक्षा भावसार यांच्या मते, पोटाची चरबी हार्मोन असंतुलन, खराब चयापचय, अनुवांशिक आणि खराब जीवनशैलीचं लक्षण आहे. पोटाची चरबी सहज आणि योग्य प्रकारे कमी करता येते आणि या घातक आजारांपासून स्वतःला वाचवता येते. त्यासाठी तुम्ही या ५ टिप्स फॉलो करून पाहायला हव्यात
Belly Fat कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतील आयुर्वेदिक उपाय
१) १२ वेळा सुर्यनमस्कार करा
तुम्ही करीना कपूरसह अनेक बॉलिवूड आणि प्रसिद्ध सेलिब्रिटींना सूर्यनमस्कार करताना पाहिले असेल. आता ही प्रसिद्ध योग मुद्रा करण्याची तयारी तुम्हीही करा. सूर्यनमस्कार हे हार्मोन्स संतुलित करण्यासाठी आणि चयापचय वाढवण्यासाठी एक उत्तम योगासन आहे. याशिवाय तुमचे मानसिक आरोग्य आणि झोपही सुधारते. त्याचबरोबर पोटाची पचनक्रियाही चांगली होते. हळूहळू पोटाची चरबीही झपाट्याने कमी होऊ लागते.
२) ७ ते ८ तासांची झोप
तुम्ही जितके चांगले झोपाल तितके सहज तुमचे वजन कमी होईल. चांगली झोप फक्त तुमच्या पोटाची चरबी जाळण्यास मदत करत नाही तर यकृत डिटॉक्सिफाय करण्यास, हार्मोन्स संतुलित करण्यास, वजन कमी करण्यास आणि तणाव संप्रेरक कॉर्टिसोल कमी करण्यास मदत करते. हे शरीर आणि मन दोन्हीला आराम देते आणि तुम्हाला अधिक उत्साही बनवते.
३) गरम पाणी पिणं
पोटाची चरबी कमी करण्यासाठी गरम पाणी केवळ प्रभावी मानले जात नाही. उलट ते चयापचय देखील वाढवते. याशिवाय संपूर्ण शरीराची चरबी कमी करता येते. यासोबतच पोट फुगणे, गॅस, भूक न लागणे आणि सतत जड वाटणे या समस्याही गरम पाण्याच्या सेवनाने दूर होतात.
केस खुप पांढरे झालेत? हेअर कलरनं लपवण्यापेक्षा 'हा' पदार्थ नियमित खाऊन मिळवा काळेभोर केस
४) इंटरमिटेंट फास्टिंग
काही काळातच अधूनमधून उपवास करणे लोकांमध्ये खूप प्रसिद्ध झाले आहे. या उपवासात जेवणामध्ये 8 तासांचे अंतर असते आणि फक्त दोन वेळचे जेवण करता येते. हा उपवास प्रामुख्याने पोटाची चरबी कमी करण्यासाठी केला जातो. दुसरीकडे, जर आपण सर्केडियन इंटरमिटंट फास्टिंगबद्दल बोललो, तर यामध्ये एखाद्या व्यक्तीला सूर्यास्तानंतर खाण्याची गरज नाही. म्हणून, शेवटचे जेवण सूर्यास्तापूर्वी किंवा थोड्या वेळाने घेतले जाते. यामध्ये जास्तीत जास्त शेवटचे जेवण रात्री ८ वाजण्यापूर्वी घ्यावे लागते.
५) कपालभाती प्राणायम
कपालभातीचे एक नाही तर दोन फायदे आहेत. जे लोक पचनाशी संबंधित समस्या, गॅस्ट्रिक समस्या आणि निद्रानाश समस्यांनी ग्रस्त आहेत. अशा लोकांनी कपालभाती प्राणायाम जरूर करावा. डॉ दिक्षा यांच्या मते, कपालभाती प्राणायाम रक्ताभिसरण, पचन आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. याशिवाय ज्या महिला मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होण्याच्या समस्येने ग्रासल्या आहेत, त्यांच्यासाठीही हे फायदेशीर ठरू शकते, असे डॉ. दीक्षा सांगतात.