Join us  

Belly Fat Loss Drink : शरीर बारीक पण पोट वाढलंय? रोज रात्री झोपताना २ ड्रिंक्स घ्या, कायम मेंटेन दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2022 5:48 PM

Belly Fat Loss Drink : जर तुम्ही रात्री जास्त कॅलरीयुक्त आहार घेतला तर तुम्ही मोठी चूक करत आहात. त्यामुळे पोटाची चरबी झपाट्याने वाढते.

वजन कमी करणे कोणत्याही व्यक्तीसाठी सोपे नसते, यासाठी कठोर आहार आणि जड व्यायामाचा अवलंब करावा लागतो, अनेक वेळा सर्व प्रयत्न करूनही पोट आणि कंबरेभोवतीची चरबी कमी होत नाही, तर समजून घ्या की दैनंदिन जीवनात आपण काही आहे ना काही चुका करत असतील. (Belly Fat Loss Drink) खूप कमी लोकांना हे माहित असेल की रात्रीच्या जेवणात काय आणि किती खात आहे  यावरही वजन वाढणे अवलंबून असते. (How to loss Belly Fat) जर तुम्ही जास्त कॅलरीयुक्त आहार घेतला तर तुम्ही मोठी चूक करत आहात. त्यामुळे पोटाची चरबी झपाट्याने वाढते. (Weight loss drinks fenugreek tea turmeric milk haldi doodh obesity belly fat)

भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स यांच्या मते, जर तुम्ही तुमचे वजन कमी करण्याबाबत गंभीर असाल तर रात्री झोपण्याच्या २ तास आधी अन्न खा, कारण जेवणानंतर लगेच झोपणे आरोग्यासाठी चांगले नाही. याशिवाय, तुम्हाला अशा काही पेयांचे सेवन करावे लागेल जे तुमचे वजन कमी करण्यात मदत करू शकतात.

घातक कॉलेस्टेरॉलला शरीराबाहेर फेकतील हे ५ पदार्थ, तब्येत कायम राहील ठणठणीत, फिट

हळदीचं दूध

हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात, म्हणून या मसाल्याचे सेवन करण्याची शिफारस केली जाते. त्याच वेळी, दुधाला संपूर्ण आहार म्हटले जाते कारण त्यात जवळजवळ सर्व प्रकारचे पोषक घटक आढळतात. या दोघांचे मिश्रण वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे रात्री हळदीचे दूध प्यावे.

मेथीची चहा

जर तुम्हाला सपाट पोट मिळवायचे असेल तर आजपासून मेथीचा चहा प्यायला सुरुवात करा.  मेथीचा चहा पचनक्रिया सुधारून वजन कमी करू शकतो. यासाठी तुम्ही एका ग्लास पाण्यात एक चमचा मेथी टाका आणि रात्रभर भिजत ठेवा. हे पाणी सकाळी गाळून घ्या आणि रात्री थोडे गरम करून प्या. त्याचा परिणाम काही दिवसात दिसून येईल.

टॅग्स :हृदयरोगहेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स