Join us  

हात पाय सुकडे पण पोटच जास्त सुटलंय? बसल्या बसल्या १ व्यायाम करा, स्लिम-फिट दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 9:49 AM

Belly Fat Loss Exercises at Home (Pot kami karnyache vyavam) : पोट कमी करण्यासाठी काही साधे-सोपे व्यायाम करून तुम्ही चरबी घटवू शकता.

वाढतं वजन (Weight Loss Solution) आजकालच्या सगळ्यात मोठ्या समस्यांपैकी एक आहे. एकदा वजन वाढलं की ते कमी  करणं कठीण होतं. काहीजणांचे हात पाय बारीक असतात पण पोट बाहेर आलेलं असतं. पोटाची चरबी कमी करणं फारच कठीण काम. पोटाची चरबी कमी करण्यासाठी स्ट्रिक्ट डाएट फॉलो केलं तर अशक्तपणाही येऊ शकतो. (Reverse Cycling Help You Reduce Belly Fat)

तुम्हीसुद्धा पोटाच्या वाढलेल्या चरबीला वैतागला असाल आणि जिमला जायलााही पुरेसा वेळ मिळत नसेल तर पोट कमी करण्यासाठी काही साधे-सोपे व्यायाम करून तुम्ही चरबी घटवू शकता. (Pot Kase kami karaycha) या व्यायामांनी काहीवेळातच तुम्हाला चांगला रिजल्ट दिसून येईल. (Belly Fat Loss Exercises at Home)

पोटाची  चरबी का वाढते?

जेव्हा तुमची जीवनशैली मंद असते तेव्हा तुम्ही जे काही खात ते स्टोरेजच्या स्वरूपात जमा होते. तुम्ही जे काही खाता ते पचवण्याासठी मेहनत केली नाही तर फॅट जास्त प्रमाणात जमा होते. ज्यामुळे बेली फॅट वाढलेलं दिसून येतं. 

बेली फॅट कमी करण्यासाठी रिव्हर्स सायकलिंग

पोटावर जमा झालेलं फॅट कमी करण्यासाठी तुम्ही रिव्हर्स सायकलिंगची मदत घेऊ शकता. यामुळे पोटाची चरबी कमी करणं सहज शक्य होईल. हा व्यायाम करणं खूपच सोपं आहे. यासाठी सगळ्यात आधी एका खुर्चीवर बसा. जमीनिवर झोपूनही तुम्ही हा व्यायाम करू शकता. याचा सगळ्यात मोठा फायदा असाल की घरच्याघरी तुम्ही हा व्यायाम करू शकता.

फक्त ७ मिनिटांचा व्यायाम घरीच करा; जिमला न जाता सुटलेलं पोट होईल कमी, मेंंटेन राहाल

रिव्हर्स सायकलिंग केल्याने मांसपेशीवर जोर येतो आणि पोट, कंबरेची अतिरिक्त चरबी कमी होऊ लागते. हा व्यायाम केल्याने मेटाबॉलिझ्म स्ट्रॉग होतो आणि कॅलरीज बर्न होण्यासही मदत होते. रिव्हर्स सायकलिंग केल्यानं पोटाच्या भागाची हालचाल जास्तवेळा करावी लागते ज्यामुळे फॅट लॉस करणं  सोपं होतं. 

रिव्हर्स सायकलिंग कसे करावे?

एखाद्या मोकळ्या जागेत खुर्चीवर बसा. नंतर दोन्ही पाय एकत्र जमिनीवरून उचलून वर न्या. तुम्ही सायकल चालवताना उलटी सायकल चालवा. एका सेटमध्ये कमीत कमी १५ वेळा रिव्हर्स सायकलिंग करा. दिवसभरात १५ मिनिटांच्या अंतराने ३ वेळा रिव्हर्स सायकलिंग करा.

प्रोटीन हवंय, पनीर-बदाम परवडत नाही? प्रोटीनसाठी हा पदार्थ खा, रस्त्यावर मिळेल १० रूपये वाटा

सुरूवातीला तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार हळहूळू वेग वाढवा. एक्सपर्ट्सच्यामते पोटाची  चरबी कमी करण्यासाठी तुम्ही प्लॅन बनवत असाल तर घाई करू नका. वजन किंवा फॅट्स कमी व्हायला बराचवेळ लागू शकतो. घाईघाईत वजन कमी करणं धोकादायक ठरू शकतं. 2 ते 3 महिने व्यायामात सातत्य ठेवल्यास तुम्हाला फरक दिसून येईल.

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स