आपण नेहमीच पाहिलं असेल की शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत पोटावरची चरबी वेगानं वाढते. पोटावरची चरबी अनेक गंभीर आजाराचं कारण ठरू शकते. खूप लोक पोटावरची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम, डाएट करतात पण हवातसा बदल दिसत नाही. निरोगी जीवनशैली पोटावरची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी डाएटबरोबरच इंटेन्स वर्कआऊटही करायला हवा. (Ayurvedic Ways to Lose Belly Fat)
आयुर्वेदीक तज्ज्ञ डॉ. भुवनेश्वरी यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना पोटावर जमा झालेल्या चरबीला जीवनशैलीतील चुकांना जबाबदार धरले आहे. जंक, प्रोसेस्ड फूड, तळलेलं खाल्लं तर पोटावरीच अतिरिक्त चरबी जास्तच वाढत जाते. यापासून सुटका मिळण्यासाठी लोक इंस्टट उपाय शोधताता पण संतुलित आहार आणि व्यायाम केल्यानं बेली फॅट लॉस करणं सोपं होतं. (Ayurvedic tips to reduce belly fat ayurvedic ways to lose belly fat)
पोटावरची चरबी कमी करण्याचे आयुर्वेदीक उपाय
१) शरीरात उष्णता मेंटेन ठेवणं
आपण खात असलेलं अन्नाचं व्यवस्थित पचन होण्यासाठी आणि मेटाबॉलिझ्म वेगानं होण्यासाठी शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्यासाठी गरम द्रव पदार्थांचे सेवन करायला हवं. ठंड पदार्थ, कोल्डड्रिंक्सचं सेवन कमी प्रमाणात करा.
२) शक्यतो कोमट पाणी प्या
जर तुम्ही दिवसभर कोमट पाण्याचे सेवन केले तर शरीरातील अतिरिक्त कॅलरीज कमी होण्यात मदत होईल. याशिवाय पचनक्रियाही चांगली राहील. जेवण पचण्यासााठी आणि मेटाबॉलिझ्म फास्ट करण्यासाठी गरम पाणी फायदेशीर ठरते. यामुळे अधिकाधिक कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.
३) रात्रीचं जेवण ७ पर्यंत घ्या
आयुर्वेदानुसार जसजसं दिवस मावळतो. तसतसं आपली पचनशक्ती कमी होते. दुपारच्या तुलनेत रात्रीच्यावेळेस पचनशक्ती मंद झालेली असते. तुम्ही सुर्य मावळल्यानंतर काहीही खाल्ल्यास त्या अन्नाचं संथ गतीनं पचन होतं. न पचलेलं अन्न चरबी वाढवण्यास कारणीभूत ठरतं.
४) जेवण व्यवस्थित चावून खा
आयुर्वेदानुसार जेवण मन लावून आणि व्यवस्थित चावून खायला हवं. जेवणात लाळ आणि पाचकरस व्यवस्थित एकत्र व्हायला हवा. असं मानलं जातं की व्यवस्थित चावून खाल्लेलं जेवण ७० टक्के पचण्यायोग्य होतं. म्हणूनच नेहमीच शांततेत जेवायला हवं.
५) आयुर्वेदीक हर्ब्स फायदेशीर ठरतातसकाळी रिकाम्या पोटी जीरं, बडीशेप, आलं, दालचिनी, धणे यांसारखे मसाले उकळून मधात मिसळून प्यायल्यानं वजन कमी करण्यास मदत होते. याशिवाय त्रिफळा, आवळा, गुडुचीचे चुर्णसुद्धा वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. आयुर्वेदीक तज्ज्ञांकडून या पदार्थांच्या सेवनाची योग्य पद्धत माहित करून घ्यायला हवी.