Lokmat Sakhi >Fitness > सुटलेलं पोट कमी करायचंय तर करा रामदेव बाबांनी सांगितलेले ५ उपाय, महिनाभरात दिसेल फरक

सुटलेलं पोट कमी करायचंय तर करा रामदेव बाबांनी सांगितलेले ५ उपाय, महिनाभरात दिसेल फरक

Belly Fat Loss Tips by Yog Guru Ramdev Baba :  योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी बेली फॅट कमी करण्यासाठी रोज सोपी योगासनं करण्याचा सल्ला दिला आहे. घरच्याघरी अगदी कमी जागेत तुम्ही हे योगा प्रकार करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 11:54 AM2023-08-08T11:54:25+5:302023-08-08T14:35:18+5:30

Belly Fat Loss Tips by Yog Guru Ramdev Baba :  योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी बेली फॅट कमी करण्यासाठी रोज सोपी योगासनं करण्याचा सल्ला दिला आहे. घरच्याघरी अगदी कमी जागेत तुम्ही हे योगा प्रकार करू शकता.

Belly Fat Loss Tips by Yog Guru Ramdev Baba : Easy yoga asanas to reduce tummy fat | सुटलेलं पोट कमी करायचंय तर करा रामदेव बाबांनी सांगितलेले ५ उपाय, महिनाभरात दिसेल फरक

सुटलेलं पोट कमी करायचंय तर करा रामदेव बाबांनी सांगितलेले ५ उपाय, महिनाभरात दिसेल फरक

वजन कमी करण्यासाठी लोक योगा आणि जिम करतात. पण कोणता व्यायाम केल्यानं वजन कमी होईल याबाबत कल्पना नसते. (Belly Fat Loss Tips by Yog Guru Ramdev Baba) दिवसभरात खाण्यापिण्यात बरेच पदार्थ येत असतात त्यामुळे वजन वाढत आणि कमी करणं कठीण होतं. फिटनेस ट्रेनर किंवा योगा एक्सपर्टच्या मार्गदर्शनाखाली उपाय केल्यास चांगला परिणाम दिसून येईल. (Easy yoga asanas to reduce tummy fat) योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी बेली फॅट कमी करण्यासाठी रोज सोपी योगासनं करण्याचा सल्ला दिला आहे. घरच्याघरी अगदी कमी जागेत तुम्ही हे योगा प्रकार करू शकता.

धनुरासन 

तुम्हाला पोट आणि पाठ टोन्ड करायची असेल तर धनुष मुद्रा हा उत्तम पर्याय आहे. या आसनामुळे तुमचे कोअर मसल्स आणि पोट मजबूत होण्यास मदत होईल. हे आसन पाठ, छाती, कुल्हे, हातांमध्ये जमा झालेलं फॅट कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. 

त्रिकोणासन

त्रिकोण मुद्रा मांड्याना मजबूत बनवते. यामळे संपूर्ण शरीरात रक्त प्रवाह व्यवस्थित होतो आणि पाठदुखीपासून आराम मिळतो. इतकंच नाही तर पोट आणि कंबरेची चरबी कमी होण्यास मदत होते. 

बद्ध कोनासन

हे आसन पोटाची चरबी कमी करते. दीर्घ श्वास घेत असताना  ५० वेळा हे आसन तुम्ही करू शकता. पोटाची चरबी कमी करण्याव्यतिरिक्त  शरीरातील ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यासाठी उत्तम आहे. मांड्यांच्या आतलं फॅट कमी होऊन गुडघ्यांमध्ये स्ट्रेच येतो आणि अनेक आजार दूर होतात. 

तिर्यक ताडासन

ज्या महिलांना लठ्ठपणापासून सुटका मिळवायची आहे त्यांनी रोज ३ ते ४ वेळा हे आसन करायला हवं. पोटाची चरबी कमी होण्याव्यतिरिक्त संपूर्ण शरीराची चरबी यामुळे कमी होते. कंबरेचा घेरही कमी होतो आणि साईड फॅट कमी होतं नियमित हे आसन केल्यानं शरीर फ्लेक्सिबल बनते. 

चक्की चालासन

हे  योगासन करताना तुम्हाला चक्की चालवल्याप्रमाणे कृती करावी लागेल म्हणूनच या आसनाचे नाव असे दिले आहे. हे आसन केल्यानं बेली फॅट कमी करण्यास मदत होते.  प्रेग्नंसीनंतर अनेक महिलांचे पोट लटकते. अशावेळी फॅट घटवण्यासाठी हे योगासन फायदेशीर ठरतं. 

Web Title: Belly Fat Loss Tips by Yog Guru Ramdev Baba : Easy yoga asanas to reduce tummy fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.