Lokmat Sakhi >Fitness > पोट जास्तच सुटलंय, वजन घटत नाही? रिकाम्यापोटी 'हे' मॅजिक वॉटर प्या; घटेल चरबी

पोट जास्तच सुटलंय, वजन घटत नाही? रिकाम्यापोटी 'हे' मॅजिक वॉटर प्या; घटेल चरबी

Belly fat loss Tips : स्वयंपाकघरातले २ पदार्थ पोट कमी करण्यासाठी गुणकारी ठरतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 03:54 PM2023-03-31T15:54:16+5:302023-03-31T17:31:57+5:30

Belly fat loss Tips : स्वयंपाकघरातले २ पदार्थ पोट कमी करण्यासाठी गुणकारी ठरतील.

Belly fat loss Tips : Effective Tips to Lose Belly Fat using kitchen ingredient dalchini and honey | पोट जास्तच सुटलंय, वजन घटत नाही? रिकाम्यापोटी 'हे' मॅजिक वॉटर प्या; घटेल चरबी

पोट जास्तच सुटलंय, वजन घटत नाही? रिकाम्यापोटी 'हे' मॅजिक वॉटर प्या; घटेल चरबी

सतत बाहेरचं खाणं, हालचालींचा अभाव,  चहा-कॉफी अतिप्रमाणे यांमुळे वजन वाढणं हे खूप कॉमन झालंय. वाढलेलं वजन व्यायाम आणि डाएट करून कमी करता येतं पण डाएट व्यवस्थित ठेवणं सर्वांनाच जमतं असं नाही. अनेकजण वाढलेल्या वजनाकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे समस्या अधिकच  वाढत जाते. 2020 च्या आकडेवारीनुसार, 5 वर्षांखालील 3.9 कोटी मुलांचे वजन जास्त आहे. (Effective Tips to Lose Belly Fat using kitchen ingredient dalchini and honey)

जागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टनुसार  जर एखाद्याचा बॉडी मास इंडेक्स 25 पेक्षा जास्त असेल तर त्याचे वजन जास्त आहे. परंतु जर बीएमआय 30 पेक्षा जास्त असेल तर त्याला लठ्ठपणाचा असावा. चरबी घटवण्यासाठी लोक खूप स्वत:वर खूप मेहनत घेतात तरीही वजन घटत नाही. स्वयंपाकघरातले २ पदार्थ पोट कमी करण्यासाठी गुणकारी ठरतील. (Effective Tips to Lose Belly Fat)

मेडिकल न्यूज टुडेच्या मते, अभ्यासात असे दिसून आले आहे की दालचिनी जास्त कॅलरी किंवा जास्त चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने होणारे नुकसान कमी करते. अभ्यासात असे म्हटले गेले आहे की दालचिनीमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी मदत करू शकतात.

दालचिनी आणि मधाच्या पाण्यानं कमी होतो लठ्ठपणा

एनडीटीव्ही फूडच्या रिपोर्टनुसार मध आणि दालचिनी हे जादुई सुपरफूड आहेत. मधाच्या औषधी गुणधर्मांचे आयुर्वेदात वर्णन केले आहेत. दालचिनी मधात मिसळून त्याचे सेवन केल्यास वजन सहज नियंत्रित करता येते. मध आणि दालचिनी दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. दोन्ही वजन कमी करण्यासाठी वापरले जातात. एका अभ्यासानुसार मध भूक कमी करते. यामध्ये अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट असतात जे वजन झपाट्याने कमी करण्यास जबाबदार असतात.

एका रिपोर्टनुसार दालचिनीचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखरही कमी होते. हे चयापचय वाढवते, ज्यामुळे वजन देखील वेगाने कमी होते. दालचिनी चरबी वेनानं बर्न करते. दालचिनी वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे, हेही अभ्यासात सिद्ध झाले आहे.

दालचिनी आणि मधाचे पाणी कसे बनवायचे?

दालचिनी आणि मधाचे पाणी घरी सहज तयार करता येते.  हे तयार करण्यासाठी, एक कप पाणी उकळवा आणि त्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर घाला. यानंतर ते गॅसवरून काढून थंड करा आणि त्यात एक चमचा मध घाला. सकाळी लवकर रिकाम्या पोटी याचे सेवन करा. काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. या पाण्यासह तुम्ही लिंबू देखील घेऊ शकता. 

Web Title: Belly fat loss Tips : Effective Tips to Lose Belly Fat using kitchen ingredient dalchini and honey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.