Join us  

तब्येत बारीक पण ओटीपोट खूप सुटलंय? सकाळी अंथरूणात करा ३ व्यायाम, पोट होईल सपाट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 9:04 AM

Belly Fat Loss Tips : रोज झोपण्याआधी किंवा सकाळी उठल्यानंतर अंथरूणात  ३ व्यायाम केल्यानं तुम्ही स्वत:ला फिट मेंटेन ठेवू शकता.

व्यस्त जीवनशैलीत वर्कआऊटसाठी वेळ काढणं खूपच कठीण झालंय. अशा स्थितीत कंबरेभोवती एक्स्ट्रा फॅट जमा होऊ लागतं. ज्यामुळे फिटनेस मेंटेन ठेवता येत नाही. (Belly Fat Loss Tips) अनेकांना व्यायाम करण्यासाठी जीमला जायला खूप कंटाळा येतो. घरच्याघरी कमीत कमी वेळात तुम्ही पोट कमी करण्याचे व्यायाम करू शकता. रोज झोपण्याआधी किंवा सकाळी उठल्यानंतर अंथरूणात  ३ व्यायाम केल्यानं तुम्ही स्वत:ला फिट मेंटेन ठेवू शकता. यामुळे अगदी सहज फॅट बर्न होण्यास मदत होईल. (How to loose weight while lying in bed do this 3 morning workout)

लेग रेज

लेग रेज हा व्यायाम (Leg Raise) केल्यानं तुमच्या पायांची स्ट्रेंथ वाढेल. इतकंच नाही तर पोटाच्या आजूबाजूची चरबीसुद्धा कमी होईल. जेव्हा तुम्ही पाय उचलता तेव्हा मांसपेशींमध्ये तणाव येतो यामुळे फॅट बर्न सहज होतं. लेग रेज करण्यासाठी आधी अंथरूणात पडा नंतर  हळूहळू आकाशाकडे पाहा. पाय वर उचताना ४५ डिग्रीचा अँगल ठेवा. नंतर ६० डिग्रीचा अँगल ठेवून होल्ड करा.  २ ते ३ मिनिटं या मुद्रेत राहा.  ५ ते १५ मिनिटांपर्यंत होल्ड करण्याचा प्रयत्न करा.

विंडशिल्ड वायपर

(Image Credit - Skimble.com)

विंड शिल्ड वायपर हा व्यायाम रोज केल्यानं पाय आणि मांड्याची चरबी कमी होते. याव्यतिरिक्त कंबरेवर जमा झालेलं एक्स्ट्रा फॅटही कमी होतं.   दोन्ही पायांना ९० डिग्री एंगलवर उचलून होल्ड करा आणि गाडीच्या वायपरप्रमाणे पायांना डाव्या आणि उजव्या बाजूला न्या. १ ते २ मिनिटं हा व्यायाम  करा. अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही हा व्यायाम करून रिजल्ट मिळवू शकता.

क्रंचेस

(Image Credit- You-tube)

क्रंचेच (Crunches)  केल्यानं शरीरातील  कोअर बॉडीत स्ट्रेथ येते आणि शरीरातील वरच्या भागातील फॅट लगेच बर्न होते. यासाठी अंथरूणावर सरळ झोपा. त्यानंतर हात डोक्याच्या मागे ठेवा. पायांना ४५ डिग्रीत ठेवून शरीराचा वरचा भाग वर उचला आणि काही सेकंद होल्ड करून नंतर रिलॅक्स व्हा. १५ ते २० वेळा हा व्यायाम करून ३ सेट्स पूर्ण करा.  या व्यायामानं वेगानं पोटाचे चरबी कमी होण्यास  मदत होईल.

टॅग्स :हेल्थ टिप्सवेट लॉस टिप्स