Lokmat Sakhi >Fitness > रात्री झोपण्यापूर्वी न चुकता प्या ‘हा’ पदार्थ; सुटलेलं पोट पटापट होईल कमी-कायम दिसाल स्लिम

रात्री झोपण्यापूर्वी न चुकता प्या ‘हा’ पदार्थ; सुटलेलं पोट पटापट होईल कमी-कायम दिसाल स्लिम

Belly Fat loss Tips : दालचिनीच्या पाण्यातील एंटी ऑक्सिडेंट्स शरीराला अनेक समस्यांपासून वाचवते,

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 09:05 AM2023-05-30T09:05:00+5:302023-05-30T15:00:25+5:30

Belly Fat loss Tips : दालचिनीच्या पाण्यातील एंटी ऑक्सिडेंट्स शरीराला अनेक समस्यांपासून वाचवते,

Belly Fat loss Tips : Weight loss drink mix this spices in water benefits for health take this water before bed time | रात्री झोपण्यापूर्वी न चुकता प्या ‘हा’ पदार्थ; सुटलेलं पोट पटापट होईल कमी-कायम दिसाल स्लिम

रात्री झोपण्यापूर्वी न चुकता प्या ‘हा’ पदार्थ; सुटलेलं पोट पटापट होईल कमी-कायम दिसाल स्लिम

आपण सुंदर, आकर्षक दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. वजन कमी करण्यासाठी काहीजण वेटलॉस ड्रिंक्स (Weight Loss Drinks) घेतात तर काहीजण व्यायामाचा मार्ग निवडतात. वजन कमी करण्याासाठी व्यायामाबरोबर डाएटही करण्याचा सल्ला दिला जातो. आयुर्वेदात असे अनेक मसाले आहेत. ज्यांच्या सेवनानं शरीराला भरपूर फायदे मिळतात. यामुळे तब्येतीत सुधारणा होते. (Cinnamon water benefits for health) 

दालचिनीच्या पाण्यातील एंटी ऑक्सिडेंट्स शरीराला अनेक समस्यांपासून वाचवते, दालचिनीचं पाणी फक्त वजन कमी करत नाही तर शरीर पूर्णपणे डिटॉक्स करते. दालचिनीचं पाणी डिटॉक्सिफायरचे काम करते. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. (Weight loss drink mix this spices in water benefits for health take this water before bed time)

रात्री झोपताना वेट लॉस ड्रिंस पिण्याचे फायदे

१) रात्री झोपण्याआधी दालचिनीचं पाणी प्यायल्यानं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून शरीर पूर्णपणे डिटॉक्स होते आणि सकाळी शरीरात जमा झालेलं टॉक्सिन्स बाहेर निघतात. 

२) रात्री झोपण्याआधी दालचिनीचं पाणी प्यायल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. दालचिनीच्या पाण्यातील एंटी ऑक्सिडेंट्स  आणि पॉलिफेनॉल्स असतात यामुळे  ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

ढेरी दिवसेंदिवस वाढत चाल्लीये? १ चमचा आळशीच्या बियांचा खास उपाय, स्लिम-फिट दिसाल

३) रात्री झोपताना दालचिनीचं पाणी प्यायल्यानं चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक वाढते. दालचिनीच्या पाण्यातील फायबर्स पचनतंत्र सुधारतात. या पाण्याच्या सेवनानं शरीरातील विषारी तत्व बाहेर पडण्यास मदत होते. यामुळे त्वचेवरील घाणीचा थर दूर होतो आणि त्वचा चमकदार दिसते.

४) दालचिनीच्या पाण्यातील प्रोएंथोसायनिडीन्स शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवतात. रोज रात्री या पाण्याचे सेवन केल्यानं आजारांपासून लांब राहण्यास मदत होते. 

५)  दालचिनीचं पाणी पचनतंत्र सुधारण्यास  मदत करते. यातील फायबर्स  पोटासाठी चांगले असतात. याच्या सेवनानं एक्स्ट्रा फॅट्स कमी होण्यास मदत होते. 

सतत थकवा, अंगदुखी? ब्लड कॅन्सरचे संकेत देतात साधी वाटणारी 'ही' लक्षणं

६) रोज रात्री झोपण्याआधी दालचिनीच्या पाण्याचं सेवन केल्यास तुम्हाला पुरेपूर फायदे मिळतील. दालचिनीचं पाणी ब्रेन फंक्शन सुधारण्यास फायदेशीर ठरते. यामुळे स्मृतीसंबंधित आजार होत नाहीत. 

७) मासिक पाळीच्या दिवसात पोटात दुखत असले किंवा दात दुखत असतील तर दालचीनीं पाणी फायदेशीर ठरतं. यात वेदना करणारे गुणधर्म असतात.  रात्रीच्यावेळी हे पाणी प्यायल्यानं पिरिएड्स पेन कमी होते. आणि दातांच्या संबंधित समस्याही कमी होतात. 

Web Title: Belly Fat loss Tips : Weight loss drink mix this spices in water benefits for health take this water before bed time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.