Join us  

Workout For Belly Fat : सुटलेलं पोट कमी करण्यासाठी ३ व्यायाम, आठवड्यातून फक्त तीनदा; भाग्यश्री सांगतेय स्लिम फॉर्म्युला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2022 1:04 PM

Weight Loss Tips by Bhagyashree: सुटलेल्या पोटाचा घेर आवरणं हा अनेकांना सतावणारा प्रश्न... म्हणूनच हा घ्या त्यावरचा एक चांगला पर्याय... लवकरच फरक पडेल असं स्वत:च्या अनुभवातून सांगतेय अभिनेत्री भाग्यश्री.

ठळक मुद्देवरील प्रत्येक व्यायाम पोटावरच्या स्नायुंना बळकटी तर देताेच पण त्या भागावरची चरबी वितळविण्यासाठी मदतही करतो.

अभिनेत्री भाग्यश्री ही काजोल, माधुरी या फळीतली अभिनेत्री. त्यामुळे ती ही आता साहजिकच पन्नाशीच्या आसपास पोहोचली आहे. पण या वयातही ती अतिशय ग्लॅमरस दिसत असून तिने तिचा फिटनेस अगदी व्यवस्थित टिकवून ठेवला आहे.. फिटनेस टिकविण्यासाठी आणि पोटावरची चरबी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी कोणकोणते व्यायाम (workout for belly fat) केले पाहिजेत, याविषयी भाग्यश्रीने नुकतीच एक पोस्ट इन्स्टाग्रामला शेअर केली आहे. 

 

या पोस्टमध्ये भाग्यश्रीने ३ प्रकारचे व्यायाम सांगितले आहेत. हे व्यायाम आठवड्यातून तीन दिवस करा आणि प्रत्येक व्यायाम प्रत्येकी ३- ३ वेळा करण्याचा सल्ला तिने दिला आहे. ती म्हणते की मला वेगवेगळे पदार्थ खायला खूप आवडतं. त्यामुळे मी खाण्यावर कंट्रोल करू शकत नाही. त्यामुळेच तर पोटाचा घेर नियंत्रणात ठेवण्यासाठी (how to control belly fat?) मला काही व्यायाम नियमित करावे लागतात. हेच व्यायाम भाग्यश्रीने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

 

१. पहिल्या प्रकारात भाग्यश्री प्लँक (plank) करताना दिसत आहे. यामध्ये तिने व्हेरिएशन आणण्याचा प्रयत्न केला असून प्लँक करताना उजवा हात डाव्या पायाला  लावणे आणि डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करणे, अशा  पद्धतीचा व्यायाम ती करत आहे. पायाला जेव्हा स्पर्श कराला तेव्हा श्वास सोडा, असा सल्ला ती देत आहे.

 

२. दुसऱ्या प्रकारात ती हॅण्ड प्लँक (hand plank) करताना दिसत आहे. या व्यायामाचा अधिक परिणाम दिसून यावा, यासाठी वजन वापरा असा सल्ला तिने दिला आहे. प्लँक करताना डाऊन होणे आणि उठताना एकेका हाताने वजन उचलणे, अशा पद्धतीचा तिचा व्यायाम आहे. हा व्यायाम करताना हिप्सची कमीतकमी हालचाल होऊ द्या, असेही तिने नमूद केले. 

 

३. तिसऱ्या प्रकारात ती सिटअप्स करताना दिसत आहे. यावेळीही तिने वजन वापरले आहे.. वजन उचलून सिटअप्स करत असताना ते खूप जोराने किंवा वेगाने करू नये. सिटअप्स आणि वरील प्रत्येक व्यायाम पोटावरच्या स्नायुंना बळकटी तर देताेच पण त्या भागावरची चरबी वितळविण्यासाठी मदतही करतो. एक दिवसाआड हा व्यायाम केला तर चालेल. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सभाग्यश्रीसेलिब्रिटीइन्स्टाग्राम