Join us  

पोटाची चरबी कमी होत नाहीये? सकाळी रिकाम्या पोटी ‘हा’ पदार्थ खा; कंबर आणि पोट होईल लवकर कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 9:09 AM

Benefits of Dates for Weight Loss : जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी खजूर खात असाल तर सकाळी खजूर खा. सकाळी खाल्ल्यानं संपूर्ण दिवस कॅलरीज नियंत्रणात राहतील.

वजन कमी करण्यासाठी अनेकजण साखर खाणं सोडतात तर काहीजण साखरेचा ऑपश्न पाहतात. खजूर खाल्ल्याने तब्येतीला बरेच फायदे मिळतात.  गोड खाणं तब्येतीसाठी अनेक दृष्टीने फायदेशीर ठरतं. खजूर दिवसभरात तुम्ही कधीही खाऊ शकता. यातील पोषक तत्व शरीरासाठी फायदेशीर ठरतात. रोज सकाळी खजूर खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. (Include Dates in Your Diet for Weight Loss)  यात डायटरी फायबर्स, प्रोटीन्स, आयर्न, मॅग्नेशियम आणि व्हिटामीन्स, मिनरल्स असतात. ही पोषक तत्व वजन कमी करण्यास साहाय्यक ठरतात. (Dates for weight loss)

सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्यानं वजन कमी करण्यासही मदत होऊ शकते. एका खजूरात जवळपास ६ ग्राम कार्बोहायड्रेटस् असताात याशिवाय साखरेचे प्रमाणही खूप कमी असते यात फ्रुक्टोजचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे ते ग्लुकोजपेक्षा दुप्पटीने गोड असते. रिकाम्या पोटी खजूरचे सेवन केल्यास दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं (Benefits of Dates for Weight Loss) तुम्ही व्यायामाला सुरूवात करण्यापूर्वीसुद्धा खजूर खाऊ शकता.

वजन कमी करण्यासाठी खजूर कोणत्यावेळी खायचे?

जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी खजूर खात असाल तर सकाळी खजूर खा. सकाळी खाल्ल्यानं संपूर्ण दिवस कॅलरीज नियंत्रणात राहतील. रात्रीच्यावेळी खजूर खाऊ नये. रात्री खजूर पचवणं कठीण ठरू शकतं.रोज रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्यानं त्यातील पोषक तत्व शरीराला मिळतात आणि पूर्ण दिवस शरीर एनर्जेटिक राहतं. याशिवाय यात आयर्नचे प्रमाण जास्त असते त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबीन वाढते.

पोट सुटलं पण व्यायामाला वेळच नाही? उभ्या उभ्या फक्त २ मिनिटं रोज हा व्यायाम करा, पोट होईल कमी

सकाळी खजूर खाल्ल्यानं मेटाबॉलिझ्म वेगानं होते आणि जास्त कॅलरीज बर्न होतात. दीर्घकाळ भूक लागत नाही आणि बराचवेळ पोट भरलेलं राहतं. रात्री २ ते ३ खजूर पाण्यात भिजवून सकाळी इतर ड्रायफ्रुट्सबरोबर खा. खजूर चवीला गोड असल्यामुळे स्मूदीज, शेक, ओट्स किंवा कोणत्याही प्रोटीन्स ड्रिंक्समध्ये मिसळून तुम्ही पिऊ शकता. पण खाण्याच्या ३ ते ४ तास आधी भिजवायला विसरू नका. 

डायजेशन सुधारते

ज्या लोकांना पचनाशी संबंधित समस्या असतात त्यांनी रिकाम्या पोटी खजूर खायला हवेत. यातील फायबर्समुळे डायजेशन सुधारते आणि गॅस, एसिडीटीचा त्रास कमी होतो.  गोड खाण्याच्या क्रेव्हिंग्स कमी होतात अनेकांना गोड खायला आवडतं पण जाड होण्याच्या भितीने लोक गोड खात नाहीत. जास्त गोड खाल्ल्यानं डायबिटीजचा धोकाही वाढतो. अशा स्थितीत खजूरचे सेवन फायदेशीर ठरू शकते. यामुळे स्विट्सचे क्रेव्हिंग्स कमी होते. 

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स