अरे हे काय आहे…माझं वजन पुन्हा वाढलं…मी मागच्या महिन्यात मोजलं, माझं वजन एवढ्या लवकर १ किलोने कसं वाढलं…असे आपल्यासोबत देखील अनेकदा घडलं असेल. परंतु, सातत्याने वजन वाढत असेल तर, त्यामागे अनेक कारणे असू शकतात. मुख्य म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयी बदलली की वजन वाढतेच. त्यामुळे योग्य आहार आणि नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे.
काही लोकं व्यायाम नियमित करतात, पण योग्य आहार नसल्यामुळे वजन लवकर कमी होत नाही. जर आपलं पोट सुटलंय, कंबरेचा घेर वाढलाय? वजन काही केल्या कमी होत नसेल, किंवा व्यायाम करायला वेळ मिळत नसेल तर, स्किपिंग एक्सरसाइज करा(Benefits of Jumping Rope: To Lose Weight and More).
वजन कमी करण्यासाठी दोरीच्या उड्या प्रभावी
नियमित स्किपिंग एक्सरसाइज केल्याने वजन बऱ्याच प्रमाणात कमी होते. आर्म फॅट, थाय फॅट यासह संपूर्ण बॉडीचे वजन कमी होते. शिवाय ब्लड सर्क्युलेशन, मेंदूच्या आरोग्यासाठी उत्तम व चपळताही वाढते. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आपण नियमित दोरी उड्या मारू शकता. दररोज व्यायाम करताना जर आपण ५ मिनिटे स्किपिंग एक्सरसाइज केली तर, नक्कीच महिनाभरात २ किलो वजन कमी होऊ शकते. पण यासह योग्य आहाराचे सेवनही करायला हवे.
वजन कमी करायचं? मग खा सिमला मिरची! - वजन कमी करण्याचा एकदम सोपा आणि असरदार इलाज
स्किपिंग करताना कॅलरीज कमी होतात?
एक मिनिटं दोरी उड्या न थांबता मारल्याने १० कॅलरीज सहज बर्न होतात. अशा स्थितीत आपण नियमित २ किंवा ५ मिनिटे दोरी उड्या मारू शकता. यामुळे कॅलरीज बऱ्यापैकी कमी होतात. यामुळे पाय, नितंब, खांदे, पोट आणि हात देखील मजबूत होतात. जर आपल्याला वजन झपाट्याने कमी करायचं असेल तर, नियमित १० मिनिटं दोरी उड्या मारा.
वजन कमी करायचं असेल तर रात्री खा ३ पौष्टीक चटकदार सॅलेड, वजन होईल कमी
स्किपिंग कसे करायचे?
सर्वात आधी एकत्र पाय करून सरळ उभे राहा, नंतर कंबर, मान, खांदे, छाती, डोके आणि गुडघे सरळ ठेवा. आता दोरीची दोन्ही टोके तुमच्या दोन्ही हातांनी पकडून हलक्या हाताने उडी मारायला सुरुवात करा.