Benefits of massage with mustard oil : हिवाळ्यात रात्री झोपण्याआधी तळपायांना मोहरीचं तेल लावून मालिश करण्याचा सल्ला आयुर्वेदात देण्यात आला आहे. ही एक जुनी परंपरा असून याने आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. मोहरीच्या तेलामध्ये अनेक औषधी गुण आढळतात, ज्यामुळे अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. अशात चला जाणून घेऊ मोहरीच्या तेलाने तळपायांची मालिश करण्याचे फायदे आणि तेल लावण्याची पद्धत.
ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं
रात्री झोपण्याआधी तळपायांवर मोहरीचं तेल लावून मालिश केल्याने ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. याने मांसपेशींमधील थकवा आणि तणाव कमी होतो. ज्यामुळे पूर्ण शरीराला आराम मिळतो.
संधिवात आणि सूज होईल दूर
मोहरीच्या तेलामध्ये अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. ज्याच्या मदतीने संधिवाताचं दुखणं आणि सूज कमी करण्यास मदत मिळते. सोबतच याने नसांना आराम मिळतो आणि शरीराची हालचालही लवचिक होते.
सर्दी-पडसा होईल दूर
मोहरीचं तेल गरम असतं. ज्यामुळे तळपायांनी याने मालिश केल्याने शरीराला उष्णता मिळते. याने सर्दी-पडसा दूर करण्यास मदत मिळते. इतकंच नाही तर या तेलाच्या वापराने छातीत आणि घशात जमा कफही बाहेर पडतो.
चांगल्या झोपेसाठी फायदेशीर
मोहरीच्या तेलाने तळपायांनी मालिश केल्याने नर्वस सिस्टीम शांत होते आणि मानसिक तणावही कमी होतो. यामुळे मेंदू आणि शरीराला आराम मिळतो. याचाच परिणाम म्हणजे तुम्हाला चांगली झोपही लागते.
त्वचा मुलायम आणि ग्लोइंग होईल
मोहरीच्या तेलाने त्वचेला खोलवर पोषण मिळतं. ज्यामुळे तळपाय मुलायम आणि हेल्दी बनतात. ड्राय स्किनची समस्या दूर करण्यासोबतच याने त्वचा चमकदारही होते.
तेलाने मालिश करण्याची योग्य पद्धत
आधी मोहरीचं तेल एका वाटीमध्ये हलकं गरम करा. त्यानंतर हलकं प्रेशर देऊन कोमट तेलाने हळूहळू तळपायांची मालिश करा. रोज झोपण्याआधी मालिश केल्याने तुम्हाला अधिक फायदा मिळेल.