Lokmat Sakhi >Fitness > डोक्याचा ताप कमी करायचा तर उलटं चाला, भाग्यश्री सांगते सिध्दी रस्ते की उलटी चाल

डोक्याचा ताप कमी करायचा तर उलटं चाला, भाग्यश्री सांगते सिध्दी रस्ते की उलटी चाल

Benefits of Reverse Walking by Actress Bhagyashree : फक्त १० मिनीटांसाठी आठवड्यातून २ वेळा हा प्रयोग केल्यास फायद्याचे ठरते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2023 02:01 PM2023-05-31T14:01:23+5:302023-05-31T16:28:23+5:30

Benefits of Reverse Walking by Actress Bhagyashree : फक्त १० मिनीटांसाठी आठवड्यातून २ वेळा हा प्रयोग केल्यास फायद्याचे ठरते.

Benefits of Reverse Walking by Actress Bhagyashree : says, always walk straight, once you walk backwards, you will get only benefits... | डोक्याचा ताप कमी करायचा तर उलटं चाला, भाग्यश्री सांगते सिध्दी रस्ते की उलटी चाल

डोक्याचा ताप कमी करायचा तर उलटं चाला, भाग्यश्री सांगते सिध्दी रस्ते की उलटी चाल

फिट राहण्यासाठी आपल्यातील बरेच जण काही ना काही व्यायाम करत असतात. अगदी जीमला जाण्यापासून ते योगा, स्विमिंग, सायकलिंग असं काही ना काही सुरू असतं. मात्र सर्व वयोगटासाठी आणि कोणत्याही खर्चाशिवाय करता येणारा व्यायाम म्हणजे चालणे. त्यामुळे चालण्याचा व्यायाम करण्याला अनेक जण प्राधान्य देतात. सकाळी उठल्यावर किंवा संध्याकाळच्या वेळी नाहीतर रात्री अनेक जण अर्धआ तास तरी चालायलाच हवं म्हणून नियमित चालतात. चालण्याच्या व्यायामामुळे आरोग्याच्या अगदी लहान समस्यांपासून ते आरोग्याच्या गंभीर समस्यांही दूर होतात. पण चालणं जेवढं फायद्याचं तितकंच उलटं चालणंही फायद्याचं असतं (Benefits of Reverse Walking by Actress Bhagyashree). 

लहानपणी गंमत म्हणून आपण पालकांसोबतजाताना बरेचदा असा प्रयोग केलेला असतो. मात्र अशाप्रकारे  रिव्हर्स वॉकमुळे मधुमेह, रक्तदाब , किडनीशी संबंधित आजार बरे होण्यास मदत होते. इतकेच नाही तर मानसिक आरोग्य सुधारण्यासही याचा चांगला फायदा होतो. उलटं चालणं बोलायला सोपं पण प्रत्यक्षात उलटं चालणं अवघड आहे. कारण यामध्ये काही वेळा आपला तोल जाण्याची शक्यता असते. जवळपास 20 ते 30 मिनिटं उलटं चालण्यानं शरीराला त्याचे कोणते फायदे होतात याविषयी समजून घेणे महत्त्वाचे आहे. 

(Image : Google)
(Image : Google)

प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्रीही आहार, व्यायाम आणि फिटनेस याबाबत नेहमीच काही ना काही महत्त्वपूर्ण माहिती शेअर करत असते. नुकतीच तिने उलटे चालणे म्हणजेच रिव्हर्स वॉकिंगविषयी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केली असून यामध्ये तिने अशाप्रकारे चालण्याचे फायदे सांगितले आहेत. फक्त १० मिनीटांसाठी आठवड्यातून २ वेळा हा प्रयोग केल्यास इतरही बऱ्याच समस्यांसाठी ते फायद्याचे ठरत असल्याचे भाग्यश्री सांगते. सोशल मीडियावर तिचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स असून तिच्या पोस्टला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. त्याचप्रमाणे या पोस्टलाही भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. पाहूयात उलटं चालण्याचे भाग्यश्री सांगत असलेले फायदे कोणते...

१. चालताना साधारणपणे आपल्या चौड्यांवर ताण येतो आणि आपण पुढच्या बाजूला झुकत असल्याने गुडघे दुखण्याची समस्या वयानुसार निर्माण होते. ऑर्थ्रो आर्थरायटीससारख्या समस्या दूर होण्यासाठी याचा अतिशय चांगला फायदा होतो. 

२. उलटे चालल्याने टाचा आणि पोटऱ्यांवर ताण पडतो आणि त्याचा पोश्चर सुधारण्यासाठी अतिशय चांगला फायदा होतो. यामुळे पायांवर येणारा ताण कमी होण्यास मदत होते. पायाचे स्नायू मजबूत होण्यासाठी उलटं चालण्याचा फायदा होतो. उलटं चालण्यामुळे पायांच्या स्नायुंचा जास्त चांगला व्यायाम होतो. 

३. सरळ चालण्यापेक्षा उलटं चालण्यानं मेंदूवर जास्त ताण येतो. यामुळे मेंदूचं कार्य उत्तम होण्याला चालना मिळते. मेंदू चांगल्या क्षमतेनं आणि गतीनं काम करु लागला की मेंदू आणि शरीरातला सुसंवाद राखला जातो. मन एकाग्र व्हायला मदत होते. मेंदुचं आरोग्य चांगलं राखलं जातं.  

Web Title: Benefits of Reverse Walking by Actress Bhagyashree : says, always walk straight, once you walk backwards, you will get only benefits...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.