Lokmat Sakhi >Fitness > वजन कमी आणि पचन सुधारण्यासाठी चिमुटभर हळदीचे २ सोपे उपाय, हळदीचा वापर आरोग्यासाठी वरदान

वजन कमी आणि पचन सुधारण्यासाठी चिमुटभर हळदीचे २ सोपे उपाय, हळदीचा वापर आरोग्यासाठी वरदान

Benefits of turmeric water for weight loss and digestion : रोगप्रतिकारकशक्ती वाढवायची असेल किंवा पचन सुधारायचे असेल तर करुन पाहा हळदीचे सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2023 04:06 PM2023-11-02T16:06:51+5:302023-11-02T16:07:36+5:30

Benefits of turmeric water for weight loss and digestion : रोगप्रतिकारकशक्ती वाढवायची असेल किंवा पचन सुधारायचे असेल तर करुन पाहा हळदीचे सोपे उपाय

Benefits of turmeric water for weight loss and digestion | वजन कमी आणि पचन सुधारण्यासाठी चिमुटभर हळदीचे २ सोपे उपाय, हळदीचा वापर आरोग्यासाठी वरदान

वजन कमी आणि पचन सुधारण्यासाठी चिमुटभर हळदीचे २ सोपे उपाय, हळदीचा वापर आरोग्यासाठी वरदान

भारतात मसाल्यांना खूप महत्व आहे. मसाल्यांचा वापर फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नसून, आरोग्य सुधारण्यासाठी देखील होऊ शकते. दालचिनी, हिंग, जिरं, ओवा यासह इतर मसाल्यांचा वापर पदार्थात केल्याने पोटाचे विकार आणि वजन कमी करण्यास मदत होते. असाच एक गुणकारी मसाला म्हणजे हळद.

हळद केवळ जेवणात रंग आणत नाही तर अनेक आजारांपासून दूर ठेवण्यासही मदत करते. हळदीतील गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. हळदीचा वापर वजन, पचन आणि रक्त स्वच्छ करण्यासाठीही होऊ शकते. यासाठी हळदीचा वापर कसा करावा? याची माहिती आहारतज्ज्ञ शिखा महाजन यांनी दिली आहे(Benefits of turmeric water for weight loss and digestion).

हळदीत असतात अनेक गुण

हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, एनलगेसिक, अँटीबायोटिक गुणधर्म आढळतात. हळद हा केवळ स्वयंपाकघरात वापरला जाणारा मसाला नसून एक आयुर्वेदिक औषध देखील आहे. मुख्य म्हणजे आहारात हळदीचा वापर केल्याने पित्ताचा त्रास कमी होतो.

'मैने प्यार किया'तली सुमन आजही दिसते तरुण, पाहा तिचं सिक्रेट ग्रीन लंच- हिरव्यागार जेवणाची रंगत

वेट लॉस आणि रक्त शुद्धीकरणासाठी उपयुक्त

तज्ज्ञांच्या मते, शरीरात टॉक्सिन्स वाढल्यानंतर अनेक आजार निर्माण होतात. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास हळद मदत करते. हळदीमध्ये असलेले एन्झाईम्स रक्त शुद्ध करतात. शिवाय लिव्हरला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात. आहारात हळदीचा समावेश केल्याने शरीर डिटॉक्स होते.

वजन कमी करण्यासाठी पचनक्रिया सुरळीत सुरु राहणं गरजेचं आहे. हळद पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करते. हळदीतील कर्क्यूमिन घटक वजन कमी करण्यास मदत करते.

पोटाची चरबी, कंबरेच्या वाढलेल्या घेरामुळे त्रस्त आहात? रोज खा ५ पैकी एकतरी भाजी, पोट होईल सपाट

ज्यांना इन्फेक्शन किंवा जे लोकं लगेच आजारी पडतात, त्यांनी आपल्या आहारात हळदीचा समावेश करावा. हळदीतील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे शरीरातील बॅक्टेरिया नष्ट होतात. शिवाय आजारी पडण्याची शक्यता कमी होते.

आयुर्वेदानुसार हळदीचा करा असा वापर

- एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात अर्धा चमचा हळद घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा, तयार पाणी गाळून प्या. आपण हे पाणी सकाळी पिऊ शकता.

- याशिवाय झोपण्यापूर्वी आपण गरम दुधात हळद घालून पिऊ शकता.

Web Title: Benefits of turmeric water for weight loss and digestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.