पाठ- कंबर दुखणे, पोटावरची चरबी वाढलेली असणे (How to reduce tummy fat?), हनुवटीखाली चरबी वाढणे म्हणजेच डबल चीन (double chin) असणे या बहुसंख्य लोकांच्या तक्रारी आहेत. बरेच जण मुख्यत: याच तीन तक्रारी दूर करण्यासाठी काही ना काही उपाय शोधत असतात. आता तुम्हालाही असेच त्रास असतील तर हा घ्या ते तिन्ही त्रास कमी करण्याचा एक सोपा रामबाण उपाय (Best exercise for backpain). विशेष म्हणजे या तिन्ही गोष्टींसाठी तुम्हाला एकच उपाय करायचा आहे आणि तो सुद्धा दिवसातून फक्त एकाच मिनिटांसाठी. तो उपाय म्हणजे उष्ट्रासन (Benefits of Usthtrasana). ते कसं करायचं (how to do Ushtrasana?) आणि त्यामुळे नेमके कोणते लाभ होतात, ते आता पाहूया...
उष्ट्रासन कसे करायचे?
१. उष्ट्रासन करण्यासाठी सगळ्यात आधी वज्रासनात ताठ बसा.
२. त्यानंतर गुडघ्यावर उभे रहा. दोन्ही हात मागच्या बाजुला घेऊन एकमेकांमध्ये गुंफून घ्या.
३. आता हळूहळू डोके, मान, पाठ मागच्या बाजुला झुकवत जा आणि हाताचे तळवे जमिनीला टेकवा.
४. मान मागच्या भिंतीवर स्थिर करा आणि ही आसनस्थिती किमान ३० सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा.
५. हळूहळू वेळ वाढवत नेऊन १ मिनिटापर्यंत हा व्यायाम करावा.
उष्ट्रासन करण्याचे फायदे
१. उष्ट्रासन केल्यामुळे खांदे मजबूत होण्यास मदत होते.
२. पाठीचे दुखणे, कंबरदुखी कमी होण्यास फायदा होतो.
निर्माल्याची फुलं फेकू नका, पाण्यातही टाकू नका!- करा निर्माल्याच्या फुलांचा सुगंधी धूप घरच्याघरी
३. पोटावर ताण येतो. त्यामुळे पोट, कंबर या भागावरची चरबी कमी होते.
४. महिनाभर हे आसन नियमितपणे केल्यास मासिक पाळीतल्या वेदना कमी होतात.
५. उष्ट्रासन केल्यानंतर गळ्याच्या स्नायुंवरही ताण येतो. त्यामुळे त्या भागातली चरबी तसेच हनुवटीच्या खालची अतिरिक्त चरबी कमी होते आणि जाॅ- लाईन अगदी परफेक्ट दिसू लागते.