Join us  

हनुवटीखालची, गळ्यावरची चरबी वाढल्याने चेहरा जाड दिसतो? डबल चीन कमी करण्यासाठी ५ सोपे व्यायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2024 5:15 PM

Best 5 Exercise To Reduce Double Chin: डबल चीन आली असेल तर ती कमी करण्यासाठी हे काही साधे सोपे व्यायाम नियमितपणे करून पाहा.. जॉ लाईन छान होईल.(how to reduce fats on neck and chin?)

ठळक मुद्देमान वर- खाली, डावीकडे- उजवीकडे वळवणे, क्लॉकवाईज आणि ॲण्टीक्लॉकवाईज अशा पद्धतीने गोलाकार फिरवणे यामुळेही डबल चीन कमी होण्यास मदत होते. 

डॉ. अंबिका याडकीकर

हल्ली डबल चीन असण्याचा त्रास बऱ्याच जणांना जाणवतो. डबल चीन म्हणजे हनुवटी आणि गळ्याच्यामध्ये चरबीचे प्रमाण वाढणे. यामुळे आपण आहोत त्यापेक्षा जास्त लठ्ठ आणि वयस्कर दिसतो. महिलांमध्ये तर हा त्रास विशेष जाणवतो. तो त्रास कमी करण्यासाठी म्हणजे हनुवटीच्या खालची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी काही व्यायाम केले तर निश्चितच फरक पडू शकतो (best 5 exercise to reduce double chin). ते व्यायाम नेमके कोणते आणि कसे करावे, ते पाहा..(how to reduce fats on neck and chin?)

 

डबल चीन किंवा हनुवटीखालील चरबी कमी करण्यासाठी व्यायाम 

१. पहिला व्यायाम म्हणजे सुरुवातीला ओठ जोडून घेऊन त्यांचा चंबू करा आणि त्यानंतर दोन्ही गाल आतमध्ये ओढून घ्या. हे केल्यानंतर डोळे मोठे करून वरच्या दिशेला बघा. एखादा मिनिट ही अवस्था टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. असं साधारण ३ ते ४ वेळा करा.

सलग ९ दिवसांच्या उपवासामुळे ॲसिडीटी वाढण्याची भीती? ७ टिप्स- उपवासाचा त्रास मुळीच होणार नाही

२. दुसऱ्या प्रकारचा व्यायाम करण्यासाठी आकाशाच्या दिशेने वर पाहा. साधारण एखादा मिनिट त्या पद्धतीने मान वर ठेवल्यानंतर मानेची हालचाल करा. म्हणजेच उजवा कान उजव्या खांद्यावर तर डावा कान डाव्या खांद्यावर ठेवण्याचा प्रयत्न करा. असे साधारण प्रत्येकी ५- ५ वेळा करा.

 

३. तिसरा व्यायाम करण्यासाठी मान वर करून आकाशाकडे पाहा. खालचे दात वरच्या दातांवर ठेवून मानेचे स्नायू ताणून घेण्याचा प्रयत्न करा. असं साधारण चार ते पाच वेळा करा.

नवरात्रीमध्ये कुंकूमार्चन करायचं? घरीच तयार करा कोणतीही भेसळ नसणारं शुद्ध कुंकू, डागही पडणार नाहीत

४. नियमितपणे सिंहमुद्रा केल्यासही डबल चीन तसेच चेहऱ्यावरची सूज कमी करण्यास मदत होते. यासाठी जबडा ताणून घ्या. जीभ बाहेर काढा आणि डोळे मोठे करा. ही अवस्था ३० ते ४० सेकंद टिकविण्याचा प्रयत्न करा. साधारण ४ ते ५ वेळा अशी सिंहमुद्रा करा.

 

५. मान वर- खाली, डावीकडे- उजवीकडे वळवणे, क्लॉकवाईज आणि ॲण्टीक्लॉकवाईज अशा पद्धतीने गोलाकार फिरवणे यामुळेही डबल चीन तसेच मानेवरची, गळ्यावरची चरबी बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होते. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायाम