Join us  

लोकं वजनावरून हिणवतात? निराश होऊ नका, रात्री झोपण्यापूर्वी खा ५ पदार्थ, वजन होईल कमी-दिसाल सुडौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2023 11:30 AM

Best bedtime foods for weight loss : वाढत्या वजनामुळे चिंतीत असाल तर, टेन्शन सोडा, फक्त डिनरमध्ये आवर्जून खा 'या' ५ गोष्टी..

वजन कमी (Weight loss) करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत आहे. पण अनेकांना लवकर वजन कमी करण्यास यश मिळेलच असे नाही. सध्या बाजारात वजन कमी करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहे. काही उपाय फेल तर काही उपायांमुळे वजन कमी करण्यास मदत होते. वाढत्या वजनामुळे मधुमेह, ह्रदयविकार, उच्च रक्तदाब, बॅड कोलेस्टेरॉलची पातळी वाढणे यांसारख्या गंभीर आजार निर्माण होतात.

ज्यांना वेळेवर जेवण करायला वेळ मिळत नाही, त्यांना अनेकदा अवेळी भूक लागते. अनहेल्दी हॅबिट्समुळे वारंवार भूक लागते. ज्यामुळे आपण रात्रीच्या वेळेस अरबट-चरबट खाऊन झोपतो. तर काही लोकं वजन कमी करण्यासाठी रात्रीचं जेवण स्किप करतात. पण यामुळे वजन कमी होत नसून वाढते(Best bedtime foods for weight loss).

जर आपण झोपण्यापुर्वी हेल्दी पदार्थ खाऊन झोपत असाल तर, नक्कीच वजन कमी होण्यास मदत होईल. यासाठी आपल्याला कमी कॅलरीजयुक्त आहाराचे सेवन करायला हवे. वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या वेळेस कोणते पदार्थ खावे? पाहुयात.

कोण म्हणतं मिठाईमुळे फक्त वजन वाढतं? या दिवाळीत बिनधास्त खा ६ प्रकारच्या मिठाई, आरोग्यासाठी उत्तम

ग्रीक योगर्ट

जर आपल्याला रात्रीच्या वेळेस गोड पदार्थ खाण्याची होत असेल तर, आपण झोपण्यापूर्वी ग्रीक योगर्ट खाऊ शकता. ग्रीक योगर्टमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. एक कप ग्रीक योगर्टमध्ये २० ग्रॅम प्रथिने असते. ज्यामुळे पोट अधिक काळ भरलेले राहते. ग्रीक योगर्टमध्ये अमीनो अॅसिड ट्रायप्टोफॅन असते. ज्यामुळे लवकर झोप लवकर लागते. जर आपल्याला हलके पदार्थ खाऊन डिनर करायचं असेल तर, आपण त्यात ड्रायफ्रुट्स, बेरीज किंवा प्रोटीन पावडर मिक्स करून खाऊ शकता.

बदाम

वजन कमी करण्यासाठी बदाम मदत करते. बदामामध्ये असलेल्या फायबरमुळे कमी भूक लागते. नियमित मुठभर बदाम खाल्ल्याने फॅट्स जलद गतीने बर्न होतात. आपण नुसते बदाम खाऊ शकता, किंवा दुधात बदाम पावडर मिक्स करून कपभर दूध पिऊन झोपू शकता.

नाश्ता-दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण वाट्टेल तेव्हा करता? १ चूक पडते महागात, तज्ज्ञ सांगतात..

चेरी टोमॅटो

चेरी टोमॅटोमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, शिवाय त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये सोडियमचे प्रमाण कमी आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पोट अधिक काळ भरलेले राहते. शिवाय झोपही चांगली लागते. जर आपल्याला नाईट क्रेविंग होत असेल तर, आपण टोमॅटोसोबत चीज खाऊ शकता.

किवी

वजन कमी करण्यासाठी आपण किवी हे फळ खाऊ शकता. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असते. यात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. ज्यामुळे ते पचायला खूप हलके असते. रात्रीच्या वेळेस किवी खाल्ल्याने वजन तर कमी होतेच, शिवाय त्यातील गुणधर्मांमुळे झोपही चांगली लागते.

पनीर

पनीर हे लो कॅलरी फूड आहे. यात प्रोटीन खच्चून भरलेले आहे. त्यात केसिन प्रोटीन असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. याशिवाय नियमित पनीर खाल्ल्याने मसल्स रिपेअर होतात. ज्यामुळे फॅट्स जलद गतीने बर्न होतात. जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल, तर आहारात नक्कीच पनीरचा समावेश करा.

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स