Join us

हिवाळ्यात न चुकता करावा 'हा' व्यायाम; वजन भराभर कमी होईल- हृदय राहील मजबूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2024 12:54 IST

Weight Loss Tips For Winter: थंडीच्या दिवसात घराबाहेर पडून व्यायाम करण्याचा कितीही कंटाळा येत असला तरी एक खास व्यायाम नियमितपणे करायलाच पाहिजे, असं तज्ज्ञ सांगतात. बघा तो व्यायाम नेमका कोणता...(best exercise for weight loss in winter)

ठळक मुद्देहिवाळ्यात जर आपण शारिरीक व्यायाम उत्तम केला तर त्यामुळे शरीरातले काही ब्राऊन फॅट ऍक्टिव्ह होतात. हे फॅट कॅलरी बर्न करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

शरीर कमविण्यासाठी हिवाळा हा सर्वोत्तम ऋतू आहे असं मानलं जातं. त्यामुळेच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर पौष्टिक पदार्थ खावे आणि भरपूर व्यायाम करावा असं सांगतात. पण नेमकं होतं काय की थंडीमुळे आपण घराबाहेर पडून व्यायाम करण्याचा कंटाळा करतो. अगदी नियमितपणे व्यायाम करणारे लोकही हिवाळा आला की घराबाहेर जाऊन चालण्याचा, पळण्याचा, सायकलिंग करण्याचा कंटाळा करू लागतात, पण असं करू नका (Weight Loss Tips For Winter). वजन कमी करायचं असेल तर हाच एकदम बेस्ट पिरियड आहे असं तज्ज्ञ सांगत आहेत.(best exercise for weight loss in winter)

 

लाईफ सायन्स जर्नल यांनी २०२३ मध्ये याविषयीचा एक अभ्यास प्रकाशित केला होता. यामध्ये काही फिजिओथेरपीस्टने असं सांगितलं आहे की हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही पळण्याचा व्यायाम अवश्य केला पाहिजे.

ड्राय झालेले केस फक्त ५ मिनिटांत होतील सिल्की- मुलायम! केसांवर करू लागाल प्रेम, बघा उपाय 

कारण यामुळे वजन तर कमी होण्यास मदत होतेच, पण हृदयाची ताकद वाढण्यासही फायदा होतो. हृदयाला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळतं आणि त्याचं काम अधिक उत्तम होतं. हिवाळ्यात पळणे किंवा जॉगिंग किंवा सायकलिंग असे व्यायाम जर नियमितपणे केले तर हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो असंही या अभ्यासात सांगण्यात आलं आहे. 

 

थंडीच्या दिवसात जर पळण्याचा व्यायाम किंवा जॉगिंग केलं तर अंगावरची सूज बऱ्याच प्रमाणात कमी होते. त्यामुळे लगेचच इंचेस लॉस होतो आणि तुम्ही आहात त्यापेक्षा बरेच बारीक दिसू लागता. शरीरातील रक्तप्रवाह अधिक वेगवान होतो. त्यामुळे अन्नपचन, चयापचय क्रिया आणखी उत्तम होतात.

Winter Fashion: करिना कपूरचा हा ड्रेस आवडला असेल तर तुम्हीही घेऊ शकता, किंमत अगदीच कमी...

 न्यूज १८ यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१४ यावर्षी यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ यांनी एक अभ्यास केला होता. त्यानुसार असं लक्षात आलं आहे की हिवाळ्यात जर आपण शारिरीक व्यायाम उत्तम केला तर त्यामुळे शरीरातले काही ब्राऊन फॅट ऍक्टिव्ह होतात. हे फॅट कॅलरी बर्न करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे हिवाळ्यात घराबाहेर पडून व्यायाम करण्यास प्राधान्य द्या.

 

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सथंडीत त्वचेची काळजीव्यायाम