Lokmat Sakhi >Fitness > ओव्हरवेट आहात म्हणून काय झालं ? करा ५ एक्सरसाइज, दिसाल फिट आणि तंदुरुस्त...

ओव्हरवेट आहात म्हणून काय झालं ? करा ५ एक्सरसाइज, दिसाल फिट आणि तंदुरुस्त...

Exercises for overweight : Best Exercises for Overweight Females : ओव्हरवेट आहात म्हणून झटपट वजन कमी करण्यासाठी करा सोपे ५ एक्सरसाइज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2024 07:10 PM2024-08-08T19:10:28+5:302024-08-08T19:26:21+5:30

Exercises for overweight : Best Exercises for Overweight Females : ओव्हरवेट आहात म्हणून झटपट वजन कमी करण्यासाठी करा सोपे ५ एक्सरसाइज...

Best Exercises for Overweight Females Exercises for overweight 5 Best Exercises for Overweight People | ओव्हरवेट आहात म्हणून काय झालं ? करा ५ एक्सरसाइज, दिसाल फिट आणि तंदुरुस्त...

ओव्हरवेट आहात म्हणून काय झालं ? करा ५ एक्सरसाइज, दिसाल फिट आणि तंदुरुस्त...

वाढलेलं वजन कमी करणं हे सर्वात मोठे कठीण काम असते. वाढते वजन ही आजकाल एक खूप मोठी कॉमन समस्या झाली आहे. वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण खूप मेहेनत घेत असतात. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट आणि एक्सरसाइज यांची मदत घेतली जाते. परंतु काहीवेळा आपले वजन वाढून आपण इतके ओव्हरवेट होतो की, वजन कमी करण्यासाठीचे अनेक उपायही आपल्याला नीट करता येत नाहीत. वजन कमी करण्यात सर्वात मोठी समस्या तेव्हा येते जेव्हा तुमचे वजन जास्त असते आणि तुम्हाला कोणताही व्यायाम किंवा योगा सहज करता येत नाही(Exercises for overweight).

बहुतेकवेळा वाढलेल्या वजनामुळे आपले शरीर विचित्र दिसू लागते. अशावेळी आपण वेगवेगळे योगा, एक्ससाइज करतो परंतु त्याचा देखील शरीरावर फारसा परिणाम जाणवत नाही. जास्त वजन असण्याने केवळ शारीरिक आरोग्यावरच नाही तर मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. अशावेळी नेमके कोणत्या प्रकारचे एक्सरसाइज करावेत हे आपल्याला फारसे माहित नसते. यामुळे वजन कमी करण्यासाठी अनेकवेळा एक्सरसाइज करून देखील वजन कमी होतंच नाही. यासाठीच जर तुम्ही ओव्हरवेट असाल तर नेमके वजन कमी करण्यासाठी कोणते एक्सरसाइज करावेत ते पाहूयात. ISSA (इंटरनॅशनल स्पोर्ट्स सायन्स असोसिएशन) प्रमाणित फिटनेस ट्रेनर संदीप कुमार यांनी ओव्हरवेट असणाऱ्यांनी नेमके कोणते एक्सरसाइज करावेत याबद्दल अधिक माहिती दिली आहे (5 Best Exercises for Overweight People). 

ओव्हरवेट असणाऱ्यांनी नेमके कोणते एक्सरसाइज करावेत ? 

१. वॉकिंग :- ओव्हरवेट असणाऱ्यांनी वजन कमी करण्यासाठी वॉकिंग करणे आवश्यक आहे. वॉकिंगची सुरुवात करताना सर्वात आधी १५ ते २० मिनिटे दररोज चालण्याने सुरुवात करावी, नंतर हा वेळ हळुहळु वाढवत न्यावा. आठवड्यातून किमान ५ दिवस तरी रोज सलग फिरायला जा. जेवण झाल्यावर लगेच वॉकिंग करणे टाळा. जेवणानंतर २० मिनिटांनी चाला. 

डाएट की व्यायाम वजन कमी करण्यासाठी काय फायद्याचे? ‘हे’ करा- पोषणतज्ज्ञांचा सल्ला, वजन होते कमी..

२. स्विमिंग :- जर तुमचे वजन जास्त असेल तर ते कमी करण्यासाठी आपण स्विमिंग करु शकता. स्विमिंग केल्याने आपले ओव्हरवेट कमी होण्यास मदत मिळते. स्विमिंग केल्याने संपूर्ण शरीराचा एक्सरसाइज तर होतोच सोबतच आपले शरीर देखील टोन्ड केले जाते. वजन कमी करण्यासोबतच स्विमिंग आपल्या स्नायूंना बळकट करण्यासाठी देखील फायदेशीर ठरते. 

वजन कमी करण्यासाठी ‘वॉटर फास्टिंग’? पाण्याचा उपवास-हा काय भलताच ट्रेण्ड -५ गोष्टी चुकल्या तर..

३. सायकलिंग :- सायकलिंग हा एक उत्तम एक्सरसाइज आहे, ज्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि जास्तीत जास्त कॅलरीज बर्न करण्यास मदत होते. जर तुम्हाला बाहेर सायकल चालवता येत नसेल तर तुम्ही घरच्या घरीच व्यायामाची सायकल वापरू शकता. या एक्सरसाइजमुळे पाय आणि पोटाचे स्नायू देखील मजबूत होण्यास मदत मिळते. 

४. स्ट्रेंथ ट्रेनिंग :- स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्याने आपले वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्याने आपल्या स्नायूंना बळकट करण्यास आणि चयापचय क्रियेचा वेग वाढविण्यात मदत करते. ओव्हरवेट असणाऱ्यांनी स्ट्रेंथ ट्रेनिंग करताना सर्वात आधी कमी वजन आणि कमी सेट्स मारत सराव करावा. त्यानंतर हळुहळु वजन वाढवत नेऊन स्ट्रेंथ ट्रेनिंगचा सर्व करत सेट्सची संख्या देखील वाढवावी. 

५ पोटभरीचे पौष्टिक पर्याय, पोट तर भरेल - वजनही वाढणार नाही, भूक भूकही होत नाही...

५. योगा :- योगासन केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. वज्रासन, भुजंगासन आणि बालासन यांचा सराव जास्त वजन असलेल्यांसाठी  फायदेशीर ठरू शकतो. यामुळे वजन कमी होण्यास मदत होतेच शिवाय मानसिक शांतीही मिळते. 

या गोष्टीही लक्षात ठेवा...

१. कोणताही एक्सरसाइज सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा किंवा फिटनेस ट्रेनरचा सल्ला घ्या.

२. जर तुम्ही पहिल्यांदाच वर्कआउट सुरू करत असाल तर लगेच हाय इंटेंसिटीचे वर्कआउट करू नका. तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार हळूहळू त्यात वाढ आणि बदल करत राहा.

३. व्यायामासोबतच संतुलित आणि पौष्टिक आहारही घ्या. तुमच्या आहारात प्रथिने, कमी कॅलरीज असणाऱ्या आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.

४. हायड्रेशनसाठी एक्सरसाइज करण्यापूर्वी आणि नंतर भरपूर पाणी प्या.  

ओव्हरवेट असलेल्यांनी वजन कमी करण्यासाठी वर्कआउटसोबतच डाएटकडे देखील तितकेच लक्ष दिले पाहिजे. योग्य व्यायाम आणि आहाराने वजन कमी करणे शक्य असते. तुमची शारीरिक क्षमता आणि आरोग्य लक्षात घेऊन तुमच्यासाठी सर्वोत्तम व्यायाम प्रकार निवडा.

Web Title: Best Exercises for Overweight Females Exercises for overweight 5 Best Exercises for Overweight People

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.