वाढत्या वयात शरीरात वेगवेगळे बदल होत जातात. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच स्तनांच्या पेशींचीही विकास होतो आणि स्तनांचा आकार वाढू लागतो. वजन वाढल्यानंतर किंवा प्रेग्नंसीनंतर स्तन ओघळल्यासारखं वाटणं म्हणजेच स्तनांचा आकार वाढल्यानं ते सैल झाल्यासारखे वाटतात हे खूपच कॉमन आहे. (4 chest exercises for sagging breasts)
यामुळे अनेकदा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. कपड्यांची फिटींगही व्यवस्थित बसत नाही. स्तन ओघळू नयेत म्हणून काही सोपे व्यायाम प्रकार तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. (How To Fix Saggy Breasts) हे व्यायाम करण्यासाठी तुम्हाला जीम किंवा योगा सेशन्सला जाण्याची काहीही गरज नाही. घरच्याघरी अगदी कोणत्याही इक्विपमेंटशिवाय तुम्ही हे व्यायाम करू शकता.
स्तन ओघळल्यासारखे का दिसतात?
ब्रेस्ट ओघळणं किंवा सैल होण्याची अनेक कारणं असू शकतात. यातीलच एक म्हणजे चुकीच्या आकाराची ब्रा घालणं. याशिवाय प्रेग्नंसीनंतरही स्तनांमध्ये बदल होतात. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, पोषणाची कमतरता, तणाव आणि बसण्याचे चुकीचे बॉडी पोश्चर यामुळे स्तन ओघळल्यासारखे दिसतात. आरोग्यतज्ज्ञ डॉ. आशिमा नय्यर यांनी हेल्थ शॉट्स या वेबसाईटला सांगितलं की व्यायाम करणं तुमच्या छातीसाठीच फायदेशीर नाही तर ओव्हरऑल आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
सकाळी की रात्री, कोणत्यावेळी चपाती खाल्ल्यानं लवकर वजन कमी होतं? फिट राहायचं तर...
साधारणपणे वय वाढणं, गर्भावस्था, धुम्रपान आणि हार्मोनल बदल यांमुळे स्तनांच्या आकारावर परिणाम होतो. एनसीबीआयच्या एका रिपोर्टनुसार सॅगी ब्रेस्टसाठी व्यायाम करून ही समस्या सोडवता येऊ शकते. यात कोणतेही मसल्स नसतात. छातीच्या खालच्या बाजूच्या मसल्सना पेक्टोरलिस मेजर म्हणतात. व्यायाम केल्यानं या मसल्ससह ब्रेस्ट लिफ्ट होण्यास मदत होते.
१) कोबरा पोझ
यामध्ये तुम्हाला आधी पोटावर झोपावे लागेल. मग तुमचे दोन्ही पाय वेगळे करा. आता हळू हळू तोंड वर करा आणि वरच्या दिशेने पहा. हळूहळू तुमच्या छातीपर्यंत वर या आणि तुमचे लक्ष वरच्या दिशेने ठेवा. आता अर्धा मिनिट या स्थितीत रहा. तुम्ही हा व्यायाम वॉर्म अप व्यायाम म्हणूनही करू शकता.
२) ट्रॅव्हेलिंग प्लँक
आपले हात खांद्याच्या अगदी खाली ठेवा. आता तुमचा उजवा हात आणि उजवा पाय जमिनीवरून उचला उजवीकडे एक पाऊल पुढे टाका. दुसऱ्या पायानेही असेच करा. या व्यायामाचे ३ सेट्स करा.
३) पुशअप्स
घरातील भिंतींवर तुम्ही वॉल पुशअप्स आणि जमीनिवर साधे पुशअप्स मारू शकता. पुश अप्स तुमचे शरीर मजबूत आणि घट्ट करण्यासाठी एक अतिशय प्रभावी व्यायाम आहे. जर तुम्हाला हा व्यायाम सुरुवातीला करता येत नसेल तर तुम्ही तुमचे गुडघे जमिनीवर टेकवू शकता.
४) डम्बल चेस्ट प्रेस
हा व्यायाम करण्यासाठी, तुम्ही 5 ते 15 किलो वजनाचे डंबेल उचलू शकता. हे करण्यासाठी, सर्व प्रथम, आपल्या दोन्ही हातात डंबेल उचला. तुमची कंबर एकदम सरळ असावी. आपले गुडघे खाली वाकले पाहिजेत. आता दोन्ही हातात डंबेल तुमच्या छातीजवळ आणा आणि खाली न्या.