Join us  

भरपूर कॅल्शियम असणारे ५ पदार्थ, दूध आवडत नसेल- पचत नसेल तरी नो टेंशन!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2023 8:23 AM

Best Food for calcium : कॅल्शियम तर हवं पण दूध आवडत नाही? ५ पदार्थ खा, मिळेल भरपूर कॅल्शियम- हाडं राहतील ठणठशीत

शरीर निरोगी आणि तंदरूस्त ठेवण्यासाठी हेल्दी फूड्सची आवश्यकता असते. यामुळे लोक पोषक तत्व असलेल्या पदार्थांचे सेवन करता. रोजच्या आहारात ताजी फळं आणि भाज्यांचे सेवन केल्यानं शरीर आजारांपासून लांब राहते. शरीरातील एक जरी अवयव  खराब झाला तरी संपूर्ण शरीरावर वाईट परीणाम होतो.  हाडं कमकुवत झाल्यानंतर लोकांना चालण्या फिरण्यासाठी त्रास होतो. म्हणूनच हाडांना मजबूत ठेवणं खूप गरजेचं असतं. हाडं मजबूत राहण्यासाठी कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन करावे. कॅल्शियमव्यतिरिक्त व्हिटामीन्ससुद्धा हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर ठरतात. (10 Food Sources Of Calcium For Your Bones)

व्हिटामीन्स हाडांना पोषक तत्व देतात. फळं आणि भाज्यांध्ये भरभरून व्हिटामीन सी असते.  व्हिटामीन सी साठी आहारात किव्ह, आवळा, संत्री, लिंबू यांचे सेवन करा. ही फळं खाल्ल्यानं हाडं मजबूत होतात. शरीरात व्हिटामीन डी कमी झाल्यानंही हाडं कमकुवत होतात. शरीरात व्हिटामीन डी ची कमतरता भासल्यास शरीरात कॅल्शियम व्यवस्थित पोहोचत नाही.

व्हिटामीन डी चा सगळ्यात मोठा स्त्रोत सुर्यप्रकाश आहे. याव्यतिरिक्त  तुम्ही मासे, बदाम, रताळे, मशरूम आणि संत्र्याचे सेवन करू शकता. व्हिटामीन्स हाडांमध्ये खनिजांची डेंसिटी टिकवून ठेवते. ज्यांना ऑस्टिओपोरिसस झाला आहे. त्याच्यासाठी हे फायदेशीर ठरते. यामुळे हाडं लवकर कमकुवत होत नाहीत.

1) कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी  तुम्ही तीळ सुद्धा खाऊ शकता.  १ चमचा तिळात जवळपास ८८ मिलीग्राम कॅल्शियम असते. जेवणात तिळाचा समावेश करायचा असल्यास तुम्ही भाकरीमध्ये किंवा सूप, सॅलेडमध्ये हे  खाऊ शकता.

२) जेवणात दूध, दही आणि चीजचा समावेश नक्की करा. कॅल्शियमची दैनंदिन गरज भागवण्यासाठी दूध आणि त्याची उत्पादने उत्तम स्रोत आहेत.

३) सोयाबीनमध्ये कॅल्शियम आणि लोह भरपूर प्रमाणात असते. सोयाबीनमध्ये आढळणाऱ्या घटकामुळे हाडांच्या आजारात फायदा होतो. हाडे मजबूत करण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सोयाबीन खूप महत्वाचे आहे. तुम्ही जेवणात टोफूचाही समावेश करू शकता.

४) बदामाला सुपरफूड म्हटले जाते. बदामात कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. रोज बदाम खाल्ल्यानं शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होण्यास मदत होते.

५) भाज्या आपल्या आहारात मुख्य भाग असतात. खासकरून हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटामीन्स आणि मिनरल्स असतात. हिरव्या पालेभाज्या, बीन्स, ब्रोकोली या पदार्थांचा आहारात समावेश करा. बीन्स आणि ब्रोकोली यात कॅल्शियम, प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात असतात.

टॅग्स :हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स