Lokmat Sakhi >Fitness > Best milk for weight loss : गाईचं की म्हशीचं? Weigh loss साठी कोणतं दूध चांगलं? पुरेपूर फायदा मिळवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला

Best milk for weight loss : गाईचं की म्हशीचं? Weigh loss साठी कोणतं दूध चांगलं? पुरेपूर फायदा मिळवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला

Best milk for weight loss : जर तुम्ही तुमच्या आहारात नियमितपणे दुधाचा समावेश करत असाल तर याद्वारे तुमची चयापचय क्रिया वेगवान होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 01:48 PM2021-12-21T13:48:20+5:302021-12-21T13:57:28+5:30

Best milk for weight loss : जर तुम्ही तुमच्या आहारात नियमितपणे दुधाचा समावेश करत असाल तर याद्वारे तुमची चयापचय क्रिया वेगवान होते.

Best milk for weight loss : Why you should drink cow milk if you want to lose weight according to nutrition experts | Best milk for weight loss : गाईचं की म्हशीचं? Weigh loss साठी कोणतं दूध चांगलं? पुरेपूर फायदा मिळवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला

Best milk for weight loss : गाईचं की म्हशीचं? Weigh loss साठी कोणतं दूध चांगलं? पुरेपूर फायदा मिळवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला

बरेच लोक वजन कमी करण्यासाठी अनेक पद्धती आणि उपाय वापरतात. यामध्ये डाएटचा विषय असो की डाएटमधून काही निवडक गोष्टी वगळणे असो. सहसा, वजन कमी करताना, लोक त्यांच्या आहारातून दूध वगळतात, जेणेकरून वजन कमी करण्याची प्रक्रिया सुलभ होते किंवा जास्त वजन वाढत नाही. दुधाच्या सेवनाबाबत अनेकांच्या मनात गैरसमज असतात. म्हणून या लेखात तुम्हाला वजन कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या दुधाचं सेवन करायला हवं याबाबत सांगणार आहोत. (Weight Loss  Tips)

दूध हे जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या पेयांपैकी एक आहे. विशेषतः भारतात दुधाचे सेवन अधिक केले जाते. परंतु काही काळापासून लोक अनेक कारणांमुळे दुग्धजन्य पदार्थ सोडून देत आहेत. सर्वात मोठे कारण म्हणजे त्यात असलेले सॅच्युरेटेड फॅट. पण फक्त चरबीसाठी दूध सोडणे खरोखर योग्य आहे का? (Best milk for weight loss) 

पोषणतज्ञांच्या मते, जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर गाईच्या दुधाचे सेवन केल्याने तुमचे वजन कमी करण्याचे उद्दिष्ट लवकर गाठता येते. दुधामध्ये व्हिटॅमिन बी 12, कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन डी आणि रिबोफ्लेविन सारखे गुणधर्म असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात.

जर तुम्ही तुमच्या आहारात नियमितपणे दुधाचा समावेश करत असाल तर याद्वारे तुमची चयापचय क्रिया वेगवान होते, जे वजन कमी करण्यासाठी आवश्यक आहे. याशिवाय, युनायटेड स्टेट्सच्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, 100 ग्रॅम दुधात 61 कॅलरीज आणि 113 मिलीग्राम कॅल्शियमसारखे पोषक घटक आढळतात. ज्यामुळे वजन कमी करणे सोपे होते.

दूध वजन कसे कमी करते

जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे पॅकेज केलेले दूध घेत असाल तर ते तुमचे वजन वाढू शकते. कारण या दुधात चव वाढवण्यासाठी  साखरेचा वापर केला जातो. त्याऐवजी, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर तुम्ही दुधामध्ये काही नैसर्गिक गोष्टी घालून ते पौष्टिक बनवू शकता आणि वजन सहज कमी करू शकता.

दुधाची पौष्टीकता कशी वाढवता येते?

दुधाला पौष्टिक बनवण्यासाठी तुम्ही त्यात हळद, जायफळ, दालचिनी,  अश्वगंधा यांसारखे मसाले आणि औषधी वनस्पती घालून पिऊ शकता.  या औषधी वनस्पतींचे गुणधर्म केवळ तुमचे वजन कमी करू शकत नाहीत. उलट त्यांच्याद्वारे रोगप्रतिकारक शक्ती, झोप आणि इतर शारीरिक सुधारणाही होतात. पण नेहमी दूध मर्यादित प्रमाणातच प्यावे.

अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की दररोज पुरेश्या दूधाचे सेवन केल्याने, तुम्हाला कॅल्शियम मिळते, जे तुम्हाला लठ्ठपणा, टाइप 2 मधुमेह, मेटाबॉलिक सिंड्रोम आणि हृदयविकारांपासून दूर ठेवते. याशिवाय, जर तुम्ही लॅक्टोज इनटॉलरेंसच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही तुमच्या आहारात दुधाचा समावेश करु शकता.

Web Title: Best milk for weight loss : Why you should drink cow milk if you want to lose weight according to nutrition experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.