Join us  

पोट कमी करायचंय-जिभेवर कंट्रोल नाही? १ ग्लास पाण्यासोबत १ चमचा ‘या’ बिया खा, तब्येतीत दिसेल जादूई फरक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 3:46 PM

Best seeds For Quick Weight Loss : अळशीच्या बिया तुमच्या गट हेल्थसाठी बऱ्याच फायदेशीर ठरतात.

अनेकांना असं वाटतं की जगातलं सगळ्यात सोपं काम आहे वजन वाढवणं आणि सगळ्यात कठीण काम वजन कमी करणं. तुम्हालाही असं वाटत असेल तर गैरसमज वेळीच दूर व्हायला हवा व्यायामाबरोबरच डाएट प्लॅनवर फोकस करून तुम्ही लठ्ठपणापासून सुटका मिळवू शकता. (Best Seeds For Quick Weight Loss) औषधी गुणांनी परिपूर्ण अशा बियांचे सेवन करू शकता. वजन कमी करण्याव्यतिरिक्त याचे आरोग्याला इतर फायदेही मिळतील. ( How To Eat Flex Seeds To Burn Fat)

फॅट बर्न करण्यास  फायदेशीर

नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिनच्या रिपोर्टनुसार फ्लेक्ससिड्स वजन कमी करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. जास्त वजन आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी इच्छुक असलेल्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे. अळशीच्या बियांमधील पोषक तत्व मेटाबॉलिझ्म बुस्ट करतात (Ref). या लो कॅलरीजयुक्त बिया शरीरातील फॅट्स वेगानं बर्न करतात. म्हणूनच वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्ही अळशीच्या बियांना आपल्या डाएटचा एक भाग बनवू शकता. एका अभ्यासातून दिसून आले की अळशी सीआरपी  आणि टिएनए-α यांसारखे घटक कमी करण्यासाठी महत्वपूर्ण ठरते. 

वजन कमी करण्यासाठी अळशीच्या बिया पाण्यात भिजवून खाण्याच सल्ला दिला जातो. रात्री झोपण्याच्याआधी 1 ग्लास पाण्यात एक चमचा अळशीच्या बीया भिजवून ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे पाणी व्यवस्थित उकळवून घ्या नंतर गाळून घ्या.  तुम्ही लिंबाचा रस आणि मध मिसळून याचे सेवन करू शकता. 

अळशीचे फायदे

अळशीच्या बिया तुमच्या गट हेल्थसाठी बऱ्याच फायदेशीर ठरतात. पोटाशी संबंधित समस्यांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही अळशीच्या बियांचे सेवन करू शकता. अळशीच्या बियांमध्ये हेल्दी फॅट्स, फायबर्स, प्रोटीन्स, कॅल्शियम आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. अळशीच्या बीया खाल्ल्यानं मेटाबॉलिझ्म वेगानं वाढतो. या भिजवल्यानंतर याचा आकारही वाढतो.  ज्यामुळे  बराच वेळ पोट भरलेलं राहतं.

सकाळी अळशीच्या बिया खाल्ल्यानं केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.  कारण यात व्हिटामीन ई, ओमेगा ३ फॅटी एसिड्स, व्हिटामीन  बी मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय यात एंटी ऑक्सिडेंट्स आणि एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे केसांशी संबंधित समस्या टाळण्यास मदत होते. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स