दूध हा असा पदार्थ आहे जो जन्मल्यापासून ते म्हातारेहोईपर्यंत लोक पितात. दुधात पोषक तत्व असल्यानं प्रत्येक भारतीय आईचं दूध हे फेव्हरेट अन्न आहे. यात कॅल्शियम, थायमिन, निकोटिनिक एसिड, प्रोटीन आणि इतर पोषक तत्व असतात यामुळे हाडं, मासंपेशींना मजबूती मिळते. (Best Time For Drinking Milk) दूध पिण्याची योग्यवेळ कोणती, दुधाच्या सेवनाचा पुरेपूर फायदा मिळण्यासाठी दूध कोणत्या वेळी प्यायचं यावर आरोग्यतज्ज्ञांचं काय मत आहे ते समजून घेऊया. (The best time to drink milk to get maximum benefits)
आरोग्यतज्ज्ञ वय आणि इतर शारीरिक गरजांनुसार दूध पिण्याचा सल्ला देतात. वास्तविक शरीराच्या गरजा आणि आरोग्याची स्थिती वयानुसार बदलते. चांगल्या झोपेसाठी अनेकांना दूधाची गरज असते तर कोणाला हाडांच्या बळकटीसाठी दूध आवश्यक असते. कोणी किती दूध प्यायला हवं हे समजणं महत्वाचं आहे.
लहान मुलांनी दूध कधी प्यावं
मुलांबद्दल बोलायचे तर, सकाळी मुलांना दूध देणे योग्य आहे. खरं तर, मुलांना सकाळी लवकर फुल क्रीम दूध द्यायला हवं जेणेकरून त्यांची दिवसभराची कॅल्शियमची गरज भागवता येईल. हाडे मजबूत करण्यासोबतच, सकाळी प्यायलेल्या दुधात पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि प्रोटीन यांसारखे अनेक पोषक घटक मिळतात, जे दिवसभर खेळणाऱ्या आणि उड्या मारणाऱ्या मुलांना आवश्यक असतात.
तरूणांनी कधी दूध प्यायचं
त्याचप्रमाणे ज्यांना बॉडी (वेल टोन शरीर) बनवायची आहे किंवा खेळ खेळायचे आहे त्यांनीही दिवसभरात दूध प्यावे जेणेकरून त्यांना दिवसभर ऊर्जेची कमतरता भासू नये. परंतु जे लोक वृद्ध आहेत आणि ज्यांचे चयापचय कमजोर आहे त्यांनी सकाळी दूध न पिण्याचा सल्ला दिला आहे, कारण सकाळी दूध प्यायल्यानंतर दिवसभर पोटात जडपणा जाणवतो.
वयस्कर लोकांसाठी दूध पिण्याची योग्य वेळ
वृद्ध लोक कमी सक्रिय राहतात, म्हणून त्यांनी सकाळी ऐवजी संध्याकाळी दूध प्यावे आणि तेही गायीचे दूध कारण ते हलके आणि पचण्याजोगे आहे. आयुर्वेद रात्री कोमट दूध पिण्याचा सल्ला देतो जे बरोबर आहे. पण ज्यांना रात्री नीट झोप येत नाही आणि ज्यांचे पोट नीट साफ होत नाही अशा लोकांनी रात्री दूध प्यावे. रात्री दूध प्यायल्याने शरीरात ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो अॅसिड निघते, ज्यामुळे झोप येण्यास मदत होते. रात्री दूध प्यायल्याने तणाव कमी होतो आणि रात्री भूक लागत नाही.