Join us  

Best Time For Morning Walk : रोज सकाळी 'इतक्या' वाजता चालायला जा; पुरेपूर फायदा होईल, लवकर फिट व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 8:56 AM

Best Time For Morning Walk : लठ्ठपणा टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपला आहार सुधारणे आणि नियमितपणे सकाळी चालणे. (Morning Walk Benefits)

जेव्हा जेव्हा फिटनेस आणि आरोग्याविषयी चिंता असते तेव्हा सर्वप्रथम डोक्यात येते ते म्हणजे मॉर्निंग वॉक किंवा सकाळचा व्यायाम. तंदुरुस्त राहण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी सकाळी चालणे खूप फायदेशीर आहे.(Morning walk benefits) सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉक केल्याने ताजी हवा, शुद्ध वातावरण आणि सूर्याच्या प्रकाश किरणांपासून व्हिटॅमिन डी मिळते, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे मॉर्निंग वॉक करणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. (5 Health Benefits of Morning Walking Regularly)

जर तुम्ही देखील सकाळी मॉर्निंग वॉकला जाण्याचा विचार करत असाल परंतु तुम्हाला मॉर्निंग वॉकचे नियम माहित नसतील किंवा मॉर्निंग वॉक योग्य पद्धतीनं कसा करायचा हे माहित नसेल तर काळजी करू नका. (What is Best Time For Morning Walk) या लेखात तुम्हाला सकाळी चालायला जाण्याची  योग्यवेळ सांगणार आहोत.  

१) नियमित मॉर्निंग वॉक केल्याने आळस दूर होतो. शरीराचा आळस कोणाच्याही जीवनासाठी चांगला नाही. असे म्हणतात की "आळशी माणूस कधीही त्याची स्वप्ने साकार करू शकत नाही". आळशी व्यक्तीचे शरीर रोगांचे घर असते आणि त्याच्या मनात नवीन कल्पना निर्माण होत नाहीत, ज्यामुळे तो आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही.

रात्री लवकर अन् शांत झोप येण्यासाठी ५ उपाय; पडल्या पडल्यात ढाराढूर झोपाल

२) आजच्या काळात कोणीही लठ्ठ होऊ इच्छित नाही. लठ्ठपणामुळे व्यक्तिमत्त्वाविषयी न्यूनगंड येतो आणि लठ्ठपणामुळे शरीरात अनेक समस्याही निर्माण होतात. लठ्ठपणा हे अनेक आजारांचे कारण आहे. लठ्ठपणा टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपला आहार सुधारणे आणि नियमितपणे सकाळी चालणे. (Morning Walk Benefits)

३) अनियमित जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हृदयविकार झपाट्याने वाढत आहेत. अशा स्थितीत मॉर्निंग वॉकचे फायदे हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. (Walking Benefits for Heart Health) सकाळी नियमितपणे 30-50 मिनिटे चालल्यानं आणि सकाळी ताजी हवा घेतल्याने तुम्ही हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहू शकता. जर तुम्ही आधीच हृदयाशी संबंधित कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर तुम्ही नियमित मॉर्निंग वॉकला जावे.

रोज सकाळी १० मिनिटं घरीच करा हा व्यायाम; बाराही महिने निरोगी अन् कायम फिट

४) मधुमेह हा असा आजार आहे की जो एकदा कुणाला झाला की तो त्याला आयुष्यभर सोडत नाही. हा जीवघेणा आजार टाळायचा असेल तर सकाळी फिरायला जावे. जर एखादी व्यक्ती आधीच मधुमेहाची शिकार असेल तर त्याने नक्कीच सकाळी फिरायला जावे. जेणेकरून ब्लड शुगर नियंत्रणात राहील.

५) मॉर्निंग वॉक केल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवता येते. सकाळी जलद गतीनं चालण्याने शरीराला घाम येतो आणि भरपूर कॅलरीज खर्च होतात, त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते. 

रोज सकाळी किती  वाजता चालायला जायचं?

सकाळी योग्य वेळी मॉर्निंग वॉक केले तरच तुम्हाला मॉर्निंग वॉकचे फायदे मिळतील.((best time for morning walk) मॉर्निंग वॉकसाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे जेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडतो आणि जेव्हा सूर्याची किरणे सौम्य असतात. तुम्ही सकाळी 5 ते 7 या वेळेत मॉर्निंग वॉक करू शकता, मॉर्निंग वॉकसाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. सूर्योदयापूर्वी मॉर्निंग वॉक करू नये.

 रोज भाताशिवाय जेवणच जात नाही? भात बनवताना एक ट्रिक वापरा, भात खाऊनही फिट राहाल

किती वेळ चालायचं?

तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार तुम्ही ३० मिनिटे ते ६० मिनिटे मॉर्निंग वॉक करू शकता. वृद्धांनी ३० ते ४० मिनिटे मॉर्निंग वॉक करावे, तर मधुमेहाच्या रुग्णांनी ४५ ते ५० मिनिटे मॉर्निंग वॉक करावे.  प्रत्येकानं आपापल्या शारीरिक क्षमतेनुसार चालावे. 

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स